
इचलकरंजी (कोल्हापूर) : होम क्वारंटाईन असा हातावर शिक्का मारलेला असतांना अनेकजण सार्वजनिक ठिकाणी बिनधिक्कतपणे फिरतांना आढळून येत आहेत. त्यामुळे शहरातील नागरीक अशा नागरीकांच्या दहशतीखाली आहेत. याबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरीकही हैराण झाले आहेत.
कोरोनाच्या धास्तीने प्रत्येकजण खबरदारी घेत आहेत. संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. यासाठी कोरोनाग्रस्त देश अथवा राज्य किंवा शहरातून आलेल्या नागरीकांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला आहे. अशा नागरीकांनी घरातच थांबावे, अशा सूचना आहेत. पण यातील कांहीजण मेडीकल अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे फिरत आहेत. पण त्यांच्या हातावरील शिक्का पाहिल्यानंतर इतर नागरीक मात्र हबकून जातांना दिसत आहे.
होम क्वारंटाईन बिनधास्त फिरतात.
याबाबत नागरीक आयजीएम रुग्णालय अथवा पोलीस प्रशासनाला माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण दोन्ही ठिकाणांहून अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अशा नागरीकांच्यावर गुन्हे नोंद करून त्यांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्याची मागणी होत आहे. जयभिमनगर, दत्तनगर (शहापूर), गुरूकन्नननगर आदी परिसरात अशा व्यक्ती फिरत आहेत.
हेही वाचा-रत्नागिरीत कोरोनाने जागवल्या प्लेगच्या आठवणी...
साठेबाजी केल्यास कारवाई
भरमसाठ दरवाढ करून विविध जिवनावश्यक वस्तूंची विक्री करीत असल्याची तक्रार आल्यास कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी दिपक पाटील यांनी दिली. याबाबची तक्रार नगरसेवकांकडे करता येणार आहे.
हेही वाचा- जिल्हाधिकारी यांच्या इशाऱ्यानंतर डॉक्टरांनी शटर उघडले -
पोलिसात गुन्हा दाखल
राजस्थानचा क्वारंटाईन इचलकरंजीत.वाहनावर ड्रायव्हर असलेल्या येथील एकास राजस्थान पोलिसांनी शिक्का मारला होता. ती व्यक्ती आपल्या मूळ गावी येथे आली. मात्र ही व्यक्ती बाहेर फिरत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले त्यानंतर प्रशासनाने पोलिसात गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.