esakal | खाड्यांमध्ये साठतोय अशा पद्धतीने गाळ
sakal

बोलून बातमी शोधा

filt in khadi area of see level is harmful to see level velliges in future ratnagiri

खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचतो. हे थांबविण्यासाठी सह्याद्रीतील वृक्षतोड थांबवून वृक्ष लागवड केली पाहिजे.

खाड्यांमध्ये साठतोय अशा पद्धतीने गाळ

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : खाड्यांमधील गाळ काढण्याचा प्रस्ताव मत्स्य विभागाने दिला आहे; मात्र खाड्यांमध्ये नेमका गाळ कसा साठतो, याचे गुपित सह्याद्री पर्वतात लपले आहे. जिल्हा सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी आहे. सह्याद्रीमध्ये वर्षानुवर्षे बेकायदा वृक्षतोड सुरू आहे. वृक्षांनी पकडलेली माती सुटून पाण्याबरोबर समुद्राच्या मुखापर्यंत जाते; मात्र समुद्र पोटात घेत नाही. ती माती, वाळू समुद्र बाहेर टाकतो. त्यामुळे खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचतो. हे थांबविण्यासाठी सह्याद्रीतील वृक्षतोड थांबवून वृक्ष लागवड केली पाहिजे.

हेही वाचा - World Mental Health Day : सुख म्हणजे नक्की काय असतं ?

माती धरून ठेवण्यासाठीच्या उपाय करणे हाच यावरील कायमचा तोडगा आहे, असे स्पष्ट मत माजी कुलगुरू आणि पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग कद्रेकर यांनी व्यक्त केले.मत्स्य विभागाने जिल्ह्यातील २० खाड्यांमधील गाळ काढण्याचा प्रस्ताव मत्स्य आयुक्तांकडे दिला आहे. खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चिपीची झाडे, खारफुटी आदी वनस्पती आहेत. त्याचा समुद्री जीवांना फायदा होतो; मात्र खाड्या गाळाने का भरत आहेत, याचे पर्यावरणीय कारण विलक्षण आहे. म्हणून याबाबत माजी कुलगुरु कद्रेकर यांच्याशी चर्चा केल्यानतंर याचा उलगडा झाला.

ते म्हणाले, गाळ काढण्याच्या प्रस्तावामध्ये खाडी उपसायची नाही तर होड्या किंवा ट्रॉलरसाठी मार्ग करायचा आहे. जेणेकरून होड्या, ट्रॉलर्सचे अपघात टळतील. पण हा आजवर केलेला तात्पुरता उपाय आहे. खाड्यांमध्ये गाळ साचण्याचे मूळ कारण सह्याद्री पर्वतात लपले आहे. सह्याद्री पर्वतावर अनेक वर्षांपासून वृक्षतोड सुरू आहे. वृक्षाची मुळं माती धरून ठेवतात. परंतु या वृक्षतोडीमुळे माती सुटून पावसाळ्यादरम्यान ती वाहून समुद्राच्या मुखापर्यंत येतात. समुद्र पोटात काही घेत नाही. सर्व बाहेर टाकतो, त्यानुसार ही सर्व माती, वाळू बाहेर फेकली जाते. त्यामुळे खाड्या गाळाने भरल्या आहेत. सह्याद्रीतील वृक्षांची भरमसाठ होणारी कत्तल थांबली पाहिजे. यापूर्वी बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठानेही सह्याद्री सुरक्षित करण्याबाबत सांगितले होते; मात्र त्यावर विचार झालेला नाही. त्याचा हा दुष्परिणाम आहे. 

हेही वाचा -  विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी शिक्षकांची डोंगर कड्यातून पायपीट 

किनारी गावांना धोका

भाट्ये समुद्र किनाऱ्यासह सर्व किनाऱ्यावर सुरूची झाडे लावणे अत्यावश्‍यक आहे. तरच किनाऱ्याची धूप थांबेल. अन्यथा, भविष्यात किनारी गावांना धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असेही कद्रेकर यांनी स्पष्ट केले.

संपादन - स्नेहल कदम 

loading image