रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना दंड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

सावंतवाडी - शहरात आता उघड्यावर कचरा फेकण्याबाबत कडक धोरण राबविले जाणार आहे. याची प्रायोगिक तत्वावर सुरवात करण्यात आली आहे. 

नियुक्त केलेल्या समितीकडून १ जुन पासून दंड आकारणीचे प्रभावी अमंलबजावणी करण्यात येणार आहे. शहरात उघड्यावरील कचरा मोठी समस्या बनत चालली आहे.

सावंतवाडी - शहरात आता उघड्यावर कचरा फेकण्याबाबत कडक धोरण राबविले जाणार आहे. याची प्रायोगिक तत्वावर सुरवात करण्यात आली आहे. 

नियुक्त केलेल्या समितीकडून १ जुन पासून दंड आकारणीचे प्रभावी अमंलबजावणी करण्यात येणार आहे. शहरात उघड्यावरील कचरा मोठी समस्या बनत चालली आहे.

संस्थानचा वारसा लाभलेल्या या शहराला कचऱ्याचा श्राप लागलेला आहे. या श्रापापासून मुक्त श्‍वास घेण्याचा प्रयत्न शहराची पालिका करीत आहे; मात्र शहरपरिसरात वाढत असलेल्या टोलेंजंग इमारती त्याबरोबर वाढत असलेली शहराची लोकसंख्या कचरा समस्येत अधिकाधिक भर घालत आहे. वेंगुर्ले व मालवण पालिकेने कचरा व्यवस्थापनात यश मिळवून देशात उज्वल स्तरावर आपले नाव कमविले; मात्र संस्थानचा वारसा लागलेल्या व पर्यंटन बहरत असलेले हे शहर कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरले आहे.

पालिकेकडून नियम, सुचना पाट्या तसेच कचऱ्यासाठी घंटागाड्याचे उपाय करण्यात आले; मात्र शहरातील नागरीकांनीच त्याला प्रतिसाद देणे योग्य समजले नाही. आता वेंगुर्ले शहराच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी आता सावंतवाडी पालिका सज्ज झालेली आहे. २००० साली मिळालेल्या मंजुरीनुसार  उपविधी नियमाच्या माध्यमातुन शहर कचरामुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे पालिकेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले. त्यासाठी सोमवार पासून घनकचरा व्यवस्थापेसंदर्भात एक समितीही नेमली आहे. यानुसार शहरात उघड्यावर तसेच कचरा वर्गीकरण न करता टाकण्याच्या नियम तोडीवर दंड आकारण्यात येणार आहे. सध्या त्याची प्रायोगिक तत्वावर सुरवात करण्यात आली असून १ जून पासून प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसे अधिकार पालिकेला प्राप्त आहेत. शहरात नागरिकांना नियम लागू करण्यात येवूनही कोणत्याच प्रकारची अमंलबजावणी होताना दिसत नसल्यामुळे हे पाऊल उचलण्यात येणार आहे. त्यासाठी उघड्यावर कचरा फेकणाऱ्या व घनकचरा वर्गीकरण न केलेल्यावर दंड आकारण्यात येणार आहे. 

याबाबत साळगावकर म्हणाले, ‘‘कचऱ्या उघड्यावर फेकणाऱ्यावर कोणत्याच प्रकारची दया माया दाखविली जाणार नाही. त्यावर कठोर दंड आकारला जाणार आहेत. यासाठी २०० रुपयापासून दंड सूरु असून तो १० हजारापर्यंत आकारण्यात येणार आहे. तसेच १ लाखापर्यत दंड आकारण्याचे अधिकारही पालिकेला आहेत. घनकचरा व्यवस्थापनेसाठी दोन बैठका घेण्यात आल्या असून १ जून पूर्वी आणखी एक बैठक घेण्यात येणार आहे.’’ पालिकेचे राबविण्यात येणार हे कडक धोरण शहर स्वच्छता ठेवण्यास किती यश मिळविते हे येत्या काही दिवसात पहायला मिळणार आहे.

वेंगूर्ले आणि मालवण पालिकेने कचरासमस्याबाबत यश मिळवून आपले नाव देशात उज्वल केले आहे; मात्र आपण कोठेतरी मागे पडत आहोत याची जाणिव झाली आहे. कचराव्यवस्थापनेसाठी आता प्रभावी कडक धोरण राबविणेच महत्वाचे ठरणार आहे. 
- बबन साळगावकर, सावंतवाडी नगराध्यक्ष

Web Title: fine for garbage

टॅग्स