चिपळूणात बेकरीला लागली भीषण आग...

Fire in the storage room of Hirapanna Bakery at Bahadur Sheikh Naka in chiplun kokan marathi news
Fire in the storage room of Hirapanna Bakery at Bahadur Sheikh Naka in chiplun kokan marathi news

चिपळूण (रत्नागिरी) : बहादूरशेख नाका येथील हिरापन्ना बेकरीच्या स्टोरेज रूममध्ये आग लागल्याची घटना सकाळी 11 च्या सुमारास घडली. पालिकेच्या अग्निशमन दलाने धाव घेऊन काही वेळातच आग विझविली. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र शॉटसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

आगीचे कारण स्पष्ट नाही.

बहादूरशेख नाका येथील चौकात हिरापन्नाची बेकरी आहे. या बेकरीची इमारत तीन मजली आहे. तळजमल्यावर बेकरी असून वरील मजला चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मालकीचा आहे. बेकरीच्या पोटमाळ्यात खाद्यपदार्थ बनविले जाते. या ठिकाणी जाण्यासाठी विक्री काऊंटरपासून जिना आहे. तेथे सकाळी 11 वाजता आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धूर येत होता. दूर अंतरावरून धुराचे लोट दिसत होते. धूर येत असल्याचे समजल्यानंतर पोटमाळ्यातील कामगार आणि बेकरीमध्ये काम करणारे कामगार बाहेर पडले.

आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश

नागरिकांना या आगीची माहिती तत्काळ अग्निशमन दलाल माहिती दिली. आगीची माहिती मिळताच चिपळूण पालिका आणि लोटे एमआयडीसीच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तत्काळ पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत किती नुकसान झाले हे स्पष्ट झालेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com