esakal | तेव्हा राणेंचे ‘सावरकर प्रेम’ कुठे होते ...?
sakal

बोलून बातमी शोधा

ravrane press conference in vaibhavwadi kokan marathi news

इंग्रजांना माफीनामा देणारे स्वा. सावरकर हे तरुणांचे आयडॉल होऊ शकत नाहीत, अशी टीका ज्यावेळी आमदार नीतेश राणेंनी ट्‌विटच्या माध्यमातून केली

तेव्हा राणेंचे ‘सावरकर प्रेम’ कुठे होते ...?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : इंग्रजांना माफीनामा देणारे स्वा. सावरकर हे तरुणांचे आयडॉल होऊ शकत नाहीत, अशी टीका ज्यावेळी आमदार नीतेश राणेंनी ट्‌विटच्या माध्यमातून केली होती, त्यावेळी खासदार नारायण राणेंचे सावरकर प्रेम कुठे होते? असा प्रश्‍न शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी येथे उपस्थित केला. शिवाय खासदार राणेंनी सावरकरांचा इतिहास सुपुत्रांना सांगावा, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

येथील शिवसेना संपर्क कार्यालयात रावराणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, जिल्हा बॅंकेचे संचालक दिगंबर पाटील, बंडू मुंडल्ये, लक्ष्मण रावराणे, रमेश तावडे, संभाजी रावराणे, पप्पू धुरी आदी उपस्थित होते. श्री. रावराणे म्हणाले, ‘‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मजबूत स्थितीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक आहे. सरकार जनतेच्या हिताचे चांगले निर्णय घेत आहेत.

हेही वाचा- त्याने बाथरुममध्ये छुपा कॅमेरा लावून केले शूट आणि.....

सरकार घेत असलेल्या जनहिताच्या विधायक निर्णयामुळे राणेंची झोप उडाली आहे. राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. श्री. राणे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करीत आहेत. मुळात राणेंनी सावरकरांविषयी बोलणे हाच खरेतर सावरकर यांचा अपमान आहे.’’सरकारने कर्जमुक्ती योजना राबविताना सुलभ पद्धत राबविली. या कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी यादीत आतापर्यंत जिल्ह्यातील ७ हजारहून अधिक शेतकऱ्यांची नावे आली आहेत; परंतु आमदार राणे हे कर्जमुक्तीचा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याला लाभ झाला नसल्याचे वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करण्याआधी त्यांनी अभ्यास करावा, अशी टीकाही रावराणे 
यांनी केली.

हेही वाचा- बेडरुमध्ये बायको, दोन मुलांना मारुन तो हाॅलमध्ये आल्यानंतर त्याने...

नाणार’ समर्थनार्थ भाडोत्री लोक
नाणार समर्थनासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात भाडोत्री लोक गोळा केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या सभेत माजी आमदार प्रमोद जठार वैफल्यग्रस्तांसारखे बोलले. स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष विकणाऱ्या जठारांची पक्षनिष्ठा काय आहे? ती जनता ओळखून आहे. राज्यात युतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नाणारची अधिसूचना रद्द केली होती. तेव्हा जठार राजीनामा न देता पदाला चिकटून का बसले होते? अशी टीका अतुल रावराणे यांनी केली.

 हेही वाचा- कोल्हापूरातील या 4 मार्गाना मिळाला जिल्हाचा दर्जा...

आजूबाजूला फिरकलात तर...
शिवसैनिक हा निखारा आहे. शिवसेना कार्यकर्त्याच्या अंगावर जाण्याची हिम्मत कुणाकडे नाही. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांच्यावर हात उगारणे सोडा, त्यांच्या आजूबाजूला फिरकलात तरी त्यांचे हात शिवसैनिक तिथल्या तिथे उखडून काढतील. ती धमक आमच्यात आहे. हे कुणीही विसरू नये, असा इशारा रावराणे यांनी दिला.

loading image
go to top