अशी साजरी केली होती आंबडवे येथे पहिली आंबेडकर जयंती : जागवल्या आठवणी...

The first anniversary was celebrated at Ambedway in aambavde kokan marathi news
The first anniversary was celebrated at Ambedway in aambavde kokan marathi news
Updated on

मंडणगड (रत्नागिरी) : १४ एप्रिल रोजी देशवासीयांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करताना पूर्णपणे आरोग्याचं भान राखून कोणत्याही प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या किंवा समूहाच्या हातून होणार नाही याची काटेकोर काळजी घेतली. आंबेडकरवादी जनतेने बाबासाहेबांना अभिवादन करताना त्यांच्या प्रबोधनकारी विचारांचा प्रचार आणि प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्याला प्राधान्य देत खऱ्या अर्थाने जयंतीची एक नवी दिशा दाखवली आहे.

यानिमित्ताने रत्नागिरीत मंडणगड तालुक्यातील त्यांच्या आंबडवे या मूळगावी १९६८ साली पहिली जयंती ही गॅस बत्तीच्या उजेडात साजरी करण्यात आल्याची आठवण ज्येष्ठ ग्रामस्थ व अभ्यासक सुदामबाबा सकपाळ यांनी सकाळशी बोलताना जागवली. यावेळी आंबडवे येथे सुमारे शंभरजण उपस्थित होते त्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश होता.

त्यावेळी सुमारे १०० माणसे उपस्थित

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या मूळगावी संविधानिक नियमांचे पालन करून अभिवादन करण्यात आले. याआधी अशाप्रकारची वेळ कधीही आली नसल्याचे सकपाळ यांनी सांगितले. जुन्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, तत्कालीन जिल्हा परिषद सीईओ जे.डी.जाधव व अध्यक्ष अमृतराव भोसले यांच्या अधिपत्याखाली १९६८ साली आम्ही आंबडवे येथे पहिली जयंती साजरी केली.त्यावेळी वीज नसल्याने गॅस बत्तीच्या उजेडातच कार्यक्रम करण्यात आला. यानंतर २२ एप्रिल १९७९ साली आंबडवेत वीज आली. स्मारक उभे राहिले. त्यासाठी सर्वांनी अपार कष्ट घेतले.

सुदामबाबा सकपाळ यांनी जागवल्या आठवणी

सुरवातीला बाबासाहेबांच्या घराचे नूतनीकरण करण्यासाठी मंडणगड गांधी चौकातून सावरी फाटा येथे असणाऱ्या कोळसा खाण वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून आणलेले साहित्य, लोखंडी पोल कच्चा रस्ता तयार करून आंबडवेपर्यंत कसे आणले याचा वृतांत सांगितला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या आदेशावर बोलताना ते म्हणाले, बाबासाहेब म्हटल्याप्रमाणे प्रथम आम्ही भारतीय आणि शेवटीही भारतीयच आहोत. त्यामुळे संविधानाच्या आधारे चालणाऱ्या नियमांनुसार आम्ही वागतो. कायदे मोडणारे आम्ही नाहीत. त्यामुळे योग्य तो आदर ठेवत  बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली.

कोरोनाविरोधात लढण्यास आंबेडकरवाद्यांनी दिले प्रथम प्राधान्य- श्रीकांत जाधव
  १४ एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती विविध आणि वेगवेगळ्या स्वरूपात घरीच साजरी करण्यात आली. याबाबत प्रबोधन विचार मंच मंडणगडचे समन्वयक श्रीकांत जाधव यांनी सकाळशी बोलताना सांगितले की,

आंबेडकरी जनतेसाठी आणि सर्वच परिवर्तनवादी चळवळींसाठी हा दिवस हा खऱ्या अर्थाने संकल्प दिवस ठरला. एक मनस्वी आनंदाचा सोहळा, कारण तमाम शोषित आणि पीडित त्याचप्रमाणे वंचित घटकांसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी आजचा  दिवस खरा मुक्तीदिन म्हणून मानला जातो. त्या पद्धतीने तो सोहळा साजरा केला जातो, मात्र देशात आणि संपूर्ण जगभरात कोरोना नामक विषाणूचे भीषण सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी जनतेने आपल्या विवेकाचा पूर्ण विचार  करून आपल्या आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोणत्याही सामूहिक स्वरुपात साजरी करण्याला फाटा देत पूर्णतः घरांमध्ये राहून या मायबाप महापुरुषाला विनम्र अभिवादन केले.

जगाचा आणि देशाचं बदलत समाजकारण, राजकारण पाहता विवेकाचा आणि परिवर्तनवाद्यांचा आवाज असलेल्या या थोर महापुरुषाची जयंती यावर्षी मात्र आगळीवेगळी पण प्रबोधनाला विशेष महत्व देत घरोघरी साजरी करण्यात आली. मानवी समाजासमोर मानवी आरोग्यासमोर शत्रू म्हणून उभा असलेला कोरोनाविरोधात लढण्यास आंबेडकरवाद्यांनी प्रथम प्राधान्य दिल्याचे श्रीकांत जाधव म्हणाले.

आंबेडकरी समाजाने बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करताना पूर्णपणे आरोग्याचं भान राखून कोणत्याही प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या किंवा समूहाच्या हातून होणार नाही याची काटेकोर काळजी घेतलेली आहे. त्याबद्दल या परिवर्तनवादी समाजाला द्यावे तितके धन्यवाद थोडेच आहेत. आंबेडकरवादी जनतेने बाबासाहेबांना अभिवादन करताना त्यांच्या प्रबोधनकारी विचारांचा प्रचार आणि प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्याला प्राधान्य देत खऱ्या अर्थाने जयंतीची एक नवी दिशा दाखवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com