नववर्षाच्या पहिल्या दिवशी अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत भक्तांची मांदियाळी

बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा
नववर्षाच्या पहिल्या दिवशी अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत भक्तांची मांदियाळी
Updated on

पाली : अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पाली शहरात नववर्षाच्या पहिल्या दिवशी शनिवारी (ता.1) बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसराला जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते. दुपारी एक नंतर अधिक गर्दी झाली होती.

दर्शनासाठी रायगड जिल्हा, महाराष्ट्रातील विविध भागांसह मुबंई, ठाणे पुणे आदी शहरांतील आणि परराज्यातून भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते. पाली नगरपंचायतीचे कर्मचारी मास्क न लावणाऱ्या भाविकांकडून दंड वसूल करत होते. तसेच मास्क घालण्याच्या सूचना देत होते.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत भक्तांची मांदियाळी
सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, निर्बंध वाढणार : राजेश टोपे

भाविकांची गर्दी असल्याने येथील दुकानदार व हाॅटेल व्यवसायिकांचा धंदा देखिल तेजीत होता. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक महिला विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा चांगला झाला.

मंदिर परिसरातील दुकाने व हाॅटेल ग्राहकांनी गजबजले होते. परिसरातील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार , फुल व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले यांचा व्यवसाय चांगला झाला. मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत होती. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत भक्तांची मांदियाळी
राजा शिवछत्रपती महाद्वार लोकार्पण सोहळ्या निमित्त नारायणगावात विविध कार्यक्रम

वाहतूक कोंडी

पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमूळे वाहतुक कोंडी झाली होती. परंतू पाली पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने पाली पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व वाहने भक्तनिवास क्रमांक 1 च्या बाजूने वळविण्यात आली होती.

"नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आले होते. अनेकांनी चांगली खरेदी देखील केली. त्यामुळे व्यवसाय देखील चांगला झाला."

- राहुल मराठे, व्यवसाईक, बल्लाळेश्वर मंदिर

"देवस्थान ट्रस्टने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोनाकाळात विशेष खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. देवस्थानचे दोन भक्त निवास नाममात्र दरात भाविकांसाठी उपलब्ध केले आहेत. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही."

- ऍड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Adani, Reliance, NTPC MoUs Signed; Konkan Nuclear Project Site Not Finalised
Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
Marathi News Esakal
www.esakal.com