
दिवाळीपूर्वी फळपीक विमा योजनेचा पहिला हप्ता मिळणार
esakal
Highlight :
मुंबईत झालेल्या बैठकीत सिंधुदुर्गमधील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याचा पहिला हप्ता देण्याचे आश्वासन विमा कंपनीने दिले.
पालकमंत्री नीतेश राणे यांनी भारतीय कृषी विमा कंपनीच्या चालढकल कारभारावर नाराजी व्यक्त करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, फलोत्पादनमंत्री भरत गोगावले आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक मंत्रालयात पार पडली.
Agriculture News : दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिला हप्ता वितरित करण्यात येईल, असे आश्वासन संबंधित कंपनीने आज मुंबईतील बैठकीत दिले. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या पुढाकाराने झालेल्या मंत्रालयात या बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि फलोत्पादनमंत्री भरत गोगावले उपस्थित होते.