पालीत साकारले पहिले सार्वजनिक उद्यान

pali
pali

पाली - अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत लोकांना निवांत क्षण घालविण्यासाठी व बच्चेकंपनीला खेळण्याबागडण्यासाठी हक्काचे उद्यान नव्हते. मात्र पाली ग्रामपंचायतीच्या प्रयत्नाने व लोकसहभागातून येथील जुने पोलिस स्थानकाजवळ पालीतील पहिले सार्वजनिक उद्यान साकारले आहे. त्यामुळे पालीकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पालीकर मागील अनेक वर्षांपासून हक्काच्या उद्यानाची वाट पाहत होते. मात्र कोणत्याच राजकीय पक्षांनी व पुढार्यांनी यासाठी पुढाकार घेतला नव्हता. केवळ आश्वासने दिली होती. ही उद्यान झालेली जागा वर्षानुवर्षे पडीक होती. मग पाली ग्रामपंचायतीचे अपक्ष सरपंच गणेश बालके, उपसरपंच विजय मराठे व सदस्यांनी इच्छाशक्ती दाखवून उद्यानासाठी ही जागा दिली. त्यांनतर उद्यानासाठी अनेक दात्यांनी पुढाकार घेतला. कोणी बसण्यासाठी बाकडे दिले, कोणी शोभिवंत फुलझाडे व लॉन दिले. दिवाबत्तीची व्यवस्था केली. तर सिसॉ आणि घसरगुंडी देखील लोकसहभागातून बसविली जाणार आहे. आता बच्चे कंपनी या उद्यानात मनसोक्त खेळत आहेत. तर नागरिक आपला निवांत वेळ घालवत आहेत. उद्यान साकारण्यासाठी गृप ग्रामपंचायत पाली आणि एक संघर्ष समाजसेवेसाठी यांचे अमूल्य सहकार्य लाभले. तसेच ग्रामपंचायत सदस्य अमित निंबाळकर यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली.

अनेक वर्षांपासून ईच्छा होती की पालीत चांगले उद्यान असावे.  या ग्रामपंचायतीने खूप उल्लेखनीय काम केले आहे. गावातील वृद्ध आणि मुले यांची खूपच चांगली सोय झाली आहे. उद्यानासाठी माझ्याकडून दोन बाकडे दिले आहेत. मी स्वतः बागेची काळजी घेणार आहे.
- विनायक भागवत, ग्रामस्थ, पाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com