esakal | राजीवडा, भाट्ये, मांडवी खाडीतील मच्छीमार झालेत या कारणामुळे त्रस्त  
sakal

बोलून बातमी शोधा

Fisherman Tired Due To Heavy Mud In Rajivada Bhate Mandvi

भाट्ये, राजीवडा या भागात भव्य बंदर होऊ शकते. मच्छीमारी करण्याच्या अनुषंगाने हे बंदर उपयुक्त ठरू शकते; मात्र साचलेल्या गाळामुळे या परिसराचा आवश्‍यक तो विकास होऊ शकलेला नाही. पावसाळ्यात तर या भागातील नागरिकांना भीतीच्या वातावरणातच जीवन व्यतीत करावे लागते.

राजीवडा, भाट्ये, मांडवी खाडीतील मच्छीमार झालेत या कारणामुळे त्रस्त  

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - रत्नागिरीतील मांडवी, भाट्ये खाडीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. यामुळे मच्छीमारांना खूप मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. या भागातील मच्छीमार नौकांना खोल समुद्रात मासेमारी करण्याकरिता मांडवी बंदरापर्यंतचा मोठा वळसा घेऊन जावं लागते. त्यामुळे या खाडीतील असलेला गाळ काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 

भाट्ये, राजीवडा या भागात भव्य बंदर होऊ शकते. मच्छीमारी करण्याच्या अनुषंगाने हे बंदर उपयुक्त ठरू शकते; मात्र साचलेल्या गाळामुळे या परिसराचा आवश्‍यक तो विकास होऊ शकलेला नाही. पावसाळ्यात तर या भागातील नागरिकांना भीतीच्या वातावरणातच जीवन व्यतीत करावे लागते. त्यामुळे या खाडीतील असलेला गाळ काढण्यात यावा व या भागाचा पर्यटन आणि मच्छीमारीच्या विकासासाठी त्या अनुषंगाने विकास करण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.

या विषयाच्या अनुषंगाने रत्नागिरीत एक बैठकदेखील झाली. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते व कॉंग्रेस नेते हारिस शेकासन, राजीवडा येथील शब्बीर भाटकर, तनवीर सोलकर, जुबेर दाव्त, सिराज वस्ता, हिदायत दलाल, जहुर बुड्ये, कर्ला येथील आसिफ बोरकर, मजगाव येथील जहूर धामस्कर, सोमेश्वर येथील सलीम सोलकर आदी उपस्थित होते. 

भाट्येपासून विस्तीर्ण विस्तारलेल्या समुद्रात.. 

भाट्येपासून विस्तीर्ण विस्तारलेल्या समुद्रामध्ये साचलेल्या गाळामुळे कर्ला, जुवे, राजीवडा, मांडवी यासह आजूबाजूच्या गावातील मच्छीमारांना मच्छीमारीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यसभा खासदार हुसैन दलवाई, विधान परिषद आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या भागातील मच्छीमार सोसायट्यांचे प्रतिनिधी, स्थानिक मच्छीमार, सामाजिक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचे शिष्टमंडळ येत्या महिनाभरात राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री असलम शेख यांची भेट घेणार आहेत. या वेळी गाळ उपशाच्या संदर्भात त्यांच्याकडे कैफियत मांडण्यात येणार आहे