मच्छिमारांनी आधुनिक तंत्राचा वापर करावाः जानकर

शिवप्रताप देसाई
गुरुवार, 18 मे 2017

वेंगुर्ले- मच्छिमारी व्यवसायात प्रगती करायची असेल तर मच्छिमारांनी जुन्या मासेमारी पद्धतींना चिकटून न राहता नविन आधुनिक मासेमारी तंत्राचा वापर करुन मासेमारी करावी, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी येथे केले.

जानकर हे आज (गुरुवार) येथे आले आहेत. येथील सागर बंगल्यावर मच्छिमारी संस्थेचे पदाधिकारी व मिनीपर्ससीन धारक मच्छिमारांनी त्यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. यावेळी मच्छिमारी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुबल, संचालक अशोक खराडे, परवाना अधिकारी श्री. धडील, नगरपरिषद मुख्याधिकारी रामदास कोकरे, मच्छिमार दादा केळसुकर, बाबा नाईक, सतिश मोर्जे, दाजी खोबरेकर, सुधाकर वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

खाडीतील गाळ उपसा करणे, खाडीमुखाजवळ 800 मीटर लांबीचा संरक्षक बंधारा बांधणे, नौकाधारकांच्या नौकाच्या कागदपत्रांच्या फायली मत्स्यव्यवसाया कार्यालयात पेंडींग आहेत, त्यांचा निस्तारा करणे, नवाबाग किना-यावर स्लोपिंग रॅम्प (उतारता धक्का) बांधणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. मच्छिमारांना मार्गदर्शन करताना मंत्री जानकर म्हणाले, 'मच्छिमारी व्यवसायात नविन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास निश्चितच मच्छिमारांची प्रगती होण्यास मदत होईल.'

Web Title: Fishermen should use modern technics: mahadev jankar