मासेमारी प्रशिक्षणासाठी एक कोटीची मत्स्यप्रबोधिनी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

अलिबाग - रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना मासेमारीचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी "मत्स्यप्रबोधिनी' ही अत्याधुनिक मासेमारी नौका जिल्ह्यात दाखल झाली आहे. अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असणारी ही राज्यातील पहिली मच्छीमार प्रशिक्षण नौका आहे. 

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ही नौका उपलब्ध करून देण्यात आली आहे. 1 जानेवारीपासून मच्छीमारांसाठी सुरू होणाऱ्या प्रशिक्षण वर्गात या नौकेच्या साह्याने प्रशिक्षण देण्यात येईल. एक कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या या नौकेवर प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व आधुनिक सोई-सुविधा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्यात तीन हजार 444 यांत्रिकी; तर एक हजार 499 बिगरयांत्रिकी नौका आहेत. त्यांच्यावर सुमारे 35 हजार लोक काम करतात. दरवर्षी सुमारे 40 हजार मेट्रिक टन मत्स्यउत्पादन घेतले जाते. स्थानिक मच्छीमारांची सुशिक्षित, तरुण पिढी या व्यवसायापासून दुरावत चालल्याने हे अत्याधुनिक प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. 

राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून अलिबाग येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र चालवले जाते. दरवर्षी दोन तुकड्यांमध्ये तरुणांचे प्रशिक्षणवर्ग सुरू असतात. 1 जानेवारी ते 30 जून आणि 1 जुलै ते 31 डिसेंबर असा त्यांचा कालावधी असतो. प्रत्येक तुकडीत 21 प्रशिक्षणार्थी असतात. यात माशांचे विविध प्रकार, जाळ्यांचे प्रकार, बोटींचे इंजिन, त्याची दुरुस्ती, फिश फाईंडर आणि वायरलेससारख्या अत्याधुनिक यंत्रणांचा वापर यांचे प्रशिक्षण दिले जाते. 

हे प्रशिक्षण देताना प्रात्यक्षिकांसाठी मच्छीमारांच्या लहान यांत्रिक नौकांचा वापर केला जात असे. आता त्यासाठी "मत्स्यप्रबोधिनी' या नौकेची निर्मिती करण्यात आली आहे.

Web Title: Fishing Academy training