मच्छीमारांवर संक्रांत!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

रायगड जिल्ह्यातील मुरूड ते श्रीवर्धनमध्ये पूर्वसूचना न देताच सर्वेक्षण सुरु झाल्यामुळे व्यवसायावर परिणाम...

अलिबाग - मच्छीमारांना कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा विश्वासात न घेता ओएनजीसीचे सर्वेक्षण जहाज पोलर मार्कीसमुळे समुद्रातील मासेमारीवर संक्रांत येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मच्छीमारांना नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रायगड जिल्हा मच्छीमार सहकारी संघाने दिला आहे. दरम्यान, ओएनजीसीचे सर्वेक्षण अद्याप सुरू झालेले नसून, त्याबाबत आपल्याकडे कार्यक्रम जाहीर झालेला नसल्याचे येथील जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने म्हटले आहे.

रायगड जिल्ह्यातील मुरूड ते श्रीवर्धनसह परिसराच्या समुद्रात ओएनजीसी सर्वेक्षण जहाज पोलर मार्कीसमार्फत सर्वेक्षणाला सुरुवात झाल्याने मच्छीमार नौकांना मासेमारी करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण दोन महिने सुरू राहणार आहे. त्यामुळे हजारो मच्छीमारांसह या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अन्य कामगारांवर उपासमारीची पाळी येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी संबंधित कंपनीचे अधिकारी, मत्स्यव्यवसाय विभाग व मच्छीमार प्रतिनिधींची तातडीने बैठक बोलावण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रायगड जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष एस. आर. कोळी यांनी मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाला निवेदनाद्वारे  दिला आहे. 

याबरोबर मच्छीमार संघाचे अध्यक्ष शेषनाथ कोळी हे जिल्हाधिकारी, मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघ लि. मुंबई यांना याबाबत निवेदन देणार आहेत.

रायगडमध्ये गेल्या वर्षी ओएनजीसीकडून सर्व्हे झाला होता; मात्र ठिकाण सांगता येणार नाही. या वेळी मुरूड व श्रीवर्धन तालुक्‍यातील दिवेआगर येथे ४० ते ७० मीटर खोल व ६० किलोमीटर किनाऱ्यापासून सर्व्हे होणार आहे. मुरूडच्या समुद्रात सर्व्हेचे कामही सुरू झाले आहे. मच्छीमार संघटनेची लवकरच बैठक बोलाविण्यात येणार आहे.

- अविनाश नाखवा, सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालय

Web Title: fishing ban