
हर्णे (रत्नागिरी) : दापोली तालुक्यातील हर्णे बंदरातील मासेमारी नौकेला आंजर्ले खाडीमध्ये जलसमाधी मिळाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने नौकेवर असणाऱ्या 5 खल्याशांनी लगेचच पाण्यात उड्या घेतल्याने जीवितहानी टळली.
दरम्यान, सध्या कोरोनाच्या संकटाची टांगती तलवार डोक्यावर असताना काल सकाळी आंजर्ले खाडीमध्ये पाजपंढरी येथील नौका "कैलासपती" (IND-MH-04-MM-737) नौका मालक - श्री. काशीनाथ महादेव पाटील यांच्या या मासेमारी नौकेला खाडीच्या तोंडावरच जलसमाधी मिळाली. दुसऱ्या लॉकडाऊन नंतर केंद्र सरकारनेच घालून दिलेल्या नियमावलीमध्ये मासेमारी व्यवसायाला परवानगी दिली. म्हणूनच काही नौकांनी मासेमारीला सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे काल सकाळी पाटील यांची नौका सुवर्णदुर्ग किल्ल्यापासूनच जवळपाच्या अंतरावर मासेमारी करत होती. परंतु गेल्या दोनतीन दिवसांपासून सकाळी व संध्याकाळी पावसाळी ढगाळ वातावरण होऊ लागले आहे.
तसेही दरवर्षी या दिवसात मच्छीमारांची नौका किनाऱ्यावर घेण्याची घनघाई सुरू असते. त्याप्रमाणे काल सकाळी अचानक पावसासारखे वातावरण होऊन जोराचा वारा सुरू झाला होता. त्यामुळे वातावरण बिघडतय अस दिसून आल्याने ताबडतोब मासेमारी थांबवून बोट थेट लगबगीने आंजर्ले खाडीच्या दिशेने फिरवली. खाडीच्या तोंडावर येताना मात्र प्रचंड गाळ साचला आहे. याठिकाणी नौका आत खाडीत घेताना येथील मच्छीमारांची चांगलीच कसरत असते. वादळाची चिन्हे दिसू लागली म्हणून खाडीत बोट घेण्याच्या नादात बोट साचलेल्या गाळावर आदळून गाळातच रुतली. त्याचक्षणी नौकाचालकांने बोट रुतलेल्या गाळातून मागे घेऊन वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला. कारण त्यातच अजस्त्र लाटांचा जोरदार मारादेखील नौकेवर वेगाने होत होता.
वातावरण गढूळ झाल्याने समुद्र देखील खवळला होता. त्यामूळे बोट पुढे पण घेता येईना का मागे देखील घेता येईना त्यामूळे मोठमोठ्या लाटांचे पाणी पूर्णपणे नौकेत घुसल्यामुळे त्याचठिकाणी त्या नौकेला जलसमाधी मिळाली. नौकेत पाणी पूर्ण घुसल्याचे दिसताक्षणी खलाशांनी पोबारा करून मदत मागितली परंतु जवळपास कोणीही नसल्याने नौका वाचू शकली नाही. मात्र खलाशांनी पाण्यामध्ये उड्या मारून आपला जीव वाचवला. सदरची नौका पूर्णपणे जलमय झाल्यामुळे नौकेतील माशीनसह सर्व समान पाण्यात बुडाले. परंतु लगेचच मदत कार्यासाठी घटनास्थळी ग्रामस्थ एकवटले.
सदर घटनेचा मत्स्यव्यवसाय खात्या कडून पंचनामा झाला असून या घटनेमध्ये या नौकेचे २८ लाखांचे नुकसान झाले आहे. असे खात्याकडून सांगण्यात आले. आता ही नुकसान भरपाई कशी भरून काढणार? असा प्रश्न पाटील कुटुंबापुढे पडला आहे. एकीकडे कोरोनाच संकट आहेच त्यात कुठे चार पैसे मिळवायचं असलेलं साधनही गेलं त्यामुळे काशीनाथ पाटील प्रचंड हताश झाले आहेत. पुन्हा नौका काशी उभी करायची? कस कुटुंबाचं पोट भरायचं ? कुठून एवढा पैसा आणायचा ? असे अनेक प्रश्न पाटील यांना आता भेडसावत आहेत. कोरोनाच्या या महामारीच्या संकटात या अपघातामुळे झालेल्या नुकसानाच्या पर्शवभूमीवर शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळण्याची कळकळीची विनंती पाटील कुटुंबाकडून केली जात आहे.
हेही वाचा- शिकारीसाठी त्याने लावली फासकी अन् बिबट्याच्या बछड्याला गमवावा लागला जीव....
सदरच्या अपघातामुळे हर्णे बंदरात उभ्या असलेल्या नौका की ज्या काही दिवसांमध्येच आंजर्ले खाडीत आसरा घेण्याकरिता येणार आहेत. अशा नौकामालकांना नौका खाडीत घेण्याची प्रचंड चिंता लागून राहिली आहे. कारण सदरच्या नौकेचा अपघात ज्याठिणाहून नौका आत येतात त्याच ठिकाणी झाला आहे. आणि अजूनही ही नौका तिथेच आहे. त्यामूळे इतर येणाऱ्या नौका खाडीत प्रवेश करणं खूपच कठीण होणार आहे. सध्या कोरोनामुळे परिस्थिती खूप गंभीर आहे. साधने मिळणे खुपच कठीण झाले आहे. तरीसुद्धा जेसीबीच्या साहाय्याने ही नौका काहीही करून बाहेर काढणे गरजेचे आहे नाहीतर बाहेर समुद्रामध्ये असणाऱ्या नौका आंजर्ले खाडीत येऊ शकणार नाहीत. तसेच वातावरणही बिघडण्याची शक्यता आहे. हा साचलेला गाळ काढण्यासाठी अनेक मंत्र्यांकडे, संबधित शासनाकडे निवेदने देऊन सुद्धा अजून गाळ काढण्याची प्रक्रिया होत नाही. शासनाला कळकळीची विनंती आहे की सदर गाळ काढण्याची प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी नाहीतर असेच अपघात होऊन मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत राहणार आहे; असे येथील मच्छिमार हर्णे बंदर कमिटीचे सदस्य महेंद्र चोगले यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.