पाचशे एकर शेतजमीन नापीक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

उरण - उधाणामुळे खाडीकिनाऱ्याची बांधबंदिस्ती फुटून भरतीचे पाणी शेतामध्ये घुसल्याने उरण पूर्व भागातील सुमारे पाचशे एकर भातशेती जमीन नापीक झाली आहे. पुढील तीन वर्षे तरी भाताचे पीक घेता येणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. 

पूर्व भागातील भोम आणि टाकीगाव दरम्यानच्या हरिश्‍चंद्र कोठा या भागातील बांधबंदिस्ती फुटल्याने हरिश्‍चंद्र पिंपळे, हरिश्‍चंद्र कोठा आणि चिखली भोम या भागातील चिरनेर, टाकीगाव, विंधणे, भोम आणि धाकटी जुई या गावातील शेतकऱ्यांच्या सुमारे पाचशे एकर भातशेतीत खारे पाणी घुसले आहे. 

समुद्राच्या भरतीच्या पाण्यापासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेल्या बांधाची (बाह्यकाठे) गेली अनेक वर्षे दुरुस्ती न केल्याने, ही परिस्थिती ओढवल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खारजमीन विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने या भागातील खाडी काठावरील खांडीचे प्रमाण वाढू लागल्याचे दिसत आहे.

दोन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे बांधबंदिस्ती फुटली होती. त्या वेळेस या भागातील शेतकऱ्यांनी लोकवर्गणी काढून बंदिस्तीचे बांधकाम केले होते. 

विंधणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सदस्य क्रांती जोशी यांच्या पुढाकाराने या भागातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने हे बाहेरकाठे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वीही जानेवारी २०१४ ला इथे बांध फुटून शेती वाया गेली होती. गेल्या वर्षी केळवण-पुनाडे दरम्यानच्या खाडीचा बांध फुटून हजारो एकर शेती खाऱ्या पाण्यात बुडाली होती. गेली कित्येक वर्षे खारबंदिस्तीची कामे न झाल्याने या भागात नेहमी अशा घटना घडून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 

खारभूमी विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून नुकसानभरपाई मिळावी. विभागाने ताबडतोब या भागातील बांधबंदिस्तीची कामे सुरू करावीत.
- वैजनाथ ठाकूर,  सदस्य, जिल्हा परिषद

ही खासगी जमीन असल्याने येथे खारजमिनीतर्फे दुरुस्तीची कामे हाती घेता येत नाहीत. 
- सुभाष वाविकर,  कार्यकारी अभियंता, खारभूमी

Web Title: Five hundred acres of barren land