आरेवारे समुद्रात बुडून पाच जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

रत्नागिरीतील आरेवारे समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या 5 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. हे सर्व पर्यटक मुंबईतील बोरीवली येथील असल्याची माहिती मिळत आहे.

रत्नागिरी : रत्नागिरीतील आरेवारे समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या 5 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. हे सर्व पर्यटक मुंबईतील बोरीवली येथील असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिकांनी या पाच जणांचे मृतदेह शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर त्यांचे मृतदेह शोधण्यात यश आले. 

आरेवारे समुद्रकिनाऱ्याच्या अत्यंत खोल असलेल्या या भागात ही घटना घडली. त्यामुळे शोधमोहीम राबविण्यात अडचणी येत होत्या. या पाचही पर्यटकांना येथील स्थानिकांनी पोहण्यास जाऊ नका, असे सांगितले होते. मात्र, या सर्वांनी याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. बोरिवलीतील काही पर्यटक हे गणपती पुळे येथे गेले होते. त्यानंतर घरी परतताना या पाचही पर्यटकांनी आरेवारे येथील समुद्र किनाऱ्यावर थांबण्याचे ठरवले. त्यानुसार ते सर्व पोहण्यासाठी गेले असता ही घटना घडली. 

Web Title: Five people die drowning in the sea