सागरी हवामानाचा अंदाज मिळणार मोबाईलवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

रत्नागिरी - समुद्रात बसवलेल्या "वेव्ह रायडर बोया' या यंत्राद्वारे संभाव्य मासेमारी क्षेत्राची माहिती मच्छीमारांना मिळणार आहे. सागरी हवामानाची पूर्वकल्पना मच्छीमार बांधवांना मोबाईल संदेशाद्वारे मिळणार आहे. त्याचा उपयोग मच्छीमारांना सुरक्षितता आणि साधनसामग्री वाचविण्यासाठी करता येईल, असे प्रतिपादन शास्त्रज्ञ यतीन ग्रोवर (शास्त्रज्ञ, इन्कॉईस हैदराबाद) यांनी केले. जी. एस. वेदक विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. 

जी. एस. वेदक विज्ञान महाविद्यालय, भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र (विज्ञान मंत्रालय), भारत सरकार हैदराबाद तसेच सम्यक विश्व संघ यांच्यावतीने सागरी हवामान अंदाज आणि संभाव्य मासेमारी क्षेत्र या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती.

समुद्रात बसवलेल्या वेव्ह रायडर बोयाच्या जवळपास 50 मीटरच्या अंतरावर मासेमारी करू नये. जेणेकरून मासेमारी करताना जाळी अडकू शकते, म्हणून ही काळजी घ्यावी. 
यावेळी शास्त्रीय माहिती अंकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. लिऑन रिचर्ड (माजी कुलपती, कॅपिलॉन विद्यापीठ, अमेरिका), कोस्टगार्डचे कमांडिंग ऑफिसर आशीष सिंग, जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष बाबामियॉं मुकादम, जनक धोत्रेकर, प्रा. डॉ. पांडुुरंग पाटील, प्रा. नीलेश रोकडे व प्रा. डॉ. भावरे, शिरगावकर, अप्पा वांदरकर, महेश आयरे, दिलावर गोदड, सुधा मोंडकर, वसंत नाटेकर, नांदगावकर, पावसकर उपस्थित होते. 
 
दोन दिवस आधी अंदाज.... 

सागरी हवामान अंदाज हा वेव्ह रायडर बोया यंत्रणेमुुळे मच्छीमारांना व किनारी लोकांना दोन दिवस आधी मिळेल. हे यंत्र रत्नागिरीच्या समुद्रात बसवण्यात आले असून त्याचा उपयोग सर्वांना होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. 

सागरी हवामानाचा अंदाज व संभाव्य मासेमारी क्षेत्र ही तांत्रिक प्रणाली नवीन असून त्याचा मच्छीमारांना उपयोग होणार आहे. या माहितीद्वारे त्सुनामी, फयान अशासारख्या वादळांची पूर्वकल्पना मच्छीमारांना मिळेल. 

- डॉ. रिचर्ड, तज्ज्ञ

Web Title: forecast of the seaside weather will be on the mobile