मच्छीवरील बंदी गोव्याने उठवूनही फायदा नाहीच

राजेश कळंबटे
बुधवार, 26 डिसेंबर 2018

रत्नागिरी - परराज्यांतील मासळीला गोवा सरकारने १२ नोव्हेंबरपासून घातलेली बंदी ३१ डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर अंशतः उठविण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा उठवत सिंधुदुर्गमधील छोट्या मच्छीमारांनी प्रतिदिन शेकडो टन मासळी तिकडे पाठविण्यास सुरवात केली; मात्र बंदी उठविल्याचा फायदा रत्नागिरीतील मच्छीमारांना अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे येथील मच्छीमारांना केरळ, कर्नाटकसह मुंबईच्या बाजारपेठांवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

परराज्यांतील मासळीला गोवा सरकारने सहा महिन्यांसाठी बंदी घातली होती. बंदीच्या अंमलबजावणीमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील मत्स्य व्यवसायाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. इन्सुलेटेड वाहनातून आणलेल्या मासळीला परवानगी देण्यात आलेली होती. 

जिल्ह्यातील मच्छीमारांना मात्र या निर्णयाचा फायदा मिळू शकलेला नाही. रत्नागिरी तालुक्‍यासह हर्णै, नाटे या बंदरांमधून दररोज एकूण उत्पादनाच्या तीस टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मासळी गोव्यात जात होती; मात्र ही वाहतूक सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर थांबवली जाऊ लागल्यामुळे प्रतिदिन एक कोटीहून अधिक उलाढाल थांबली. त्याचा परिणाम स्थानिक बंदरातील मासळीच्या दरांवर झाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सौंदळा, पापलेट, सुरमई यांसारखे मासे गोव्यात जाऊ लागले आहेत. संपूर्ण जिल्ह्यातून मिळून सुमारे ३५ ते ४० टन मासळी तिकडे जात आहे. त्यातून चांगला दर मिळत आहे. सुमारे १० ते १२ कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. गोव्यातून सध्या मागणी इतकी वाढली आहे, की स्थानिक बाजारपेठेत ताजा मासा मिळणे मुश्‍कील झाले आहे. 

गोव्यातील माशांची मागणी आणि पुरवठा यांमधील तफावत मोठी होती. सरकारने गेल्या आठवड्यात अंशतः बंदी उठवल्यानंतर कारवार आणि कोकणातून पुरवठा सुरू झाला. प्रीमियर गटातील किंग फिश, स्नॅपर, पॉम्फेट, टायगर प्रॉन्स आदी माशांचा तुटवडा कायम असल्याने माशांचे दर ३० ते ३५ टक्‍क्‍यांनी वाढले आहेत.
- राल्फ डिसोझा, 

उपाध्यक्ष, गोवा मर्चंटस चेंबर अँड इंडस्ट्रीज

रत्नागिरी जिल्ह्यातून गोव्यात अद्यापही मासळी जाण्यास सुरवात झालेली नाही. बंदी उठविण्यात आल्याचे येथील मच्छीमारांना माहिती नाही.
- पुष्कर भुते,
मच्छीमार नेते

Web Title: formalin issue Ban on fish in Goa follow up