शिवसेनेमधूनच संजय कदम यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. मधल्या काळात शिवसेनेमध्ये वाद झाल्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये गेले आणि तिथूनच आमदार म्हणून निवडून आले.
दापोली : दापोली विधानसभा मतदारसंघाचे (Dapoli Assembly Constituency) माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कदम (Sanjay Kadam) हे शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू असताना पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय कदम यांची हकालपट्टी केली आहे. याबाबत पत्रकदेखील जारी करण्यात आले आहे.