माजी विदयार्थ्यांनी केली शाळा डिजिटल

अमित गवळे 
रविवार, 19 ऑगस्ट 2018

पाली : जिल्हा परिषद शाळेत शिकलेले अनेक विदयार्थी अाज विविध क्षेत्रात अापला ठसा उमटवित आहेत. मोठ्या हुद्यांवर असुनही अापण गावातील ज्या शासकिय शाळेतून शिकलो त्या शाळेचे पांग फेडण्यासाठी व येथील विदयार्थ्यांसाठी ते अनेक प्रकारे मदत व सहकार्य करत आहेत. राजिप शाळा राबगावचे माजी विद्यार्थी व अस्मित फाउंडेशनचे संस्थापक हनुमंत घायले या तरुणाच्या सहकार्याने राजिप शाळा राबगाव डिजिटल झाली आहे.

नुकतेच या डिजिटल शाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील विदयार्थी अाधूनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ज्ञानकन गिरवून अधिक सक्षम होतील. डिजिटल शाळेचे स्वप्न पूर्ण झाल्याने माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी राबगाव शाळेमध्ये पहिली ते सातवी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना अस्मित फाउंडेशनच्या वतीने रोख पारितोषिक व प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. येथील श्री कॉमर्स क्लासचे संचालक संतोष भोईर यांनी राजिप शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी प्यायला मिळावे यासाठी शाळेला पाणी शुद्धीकरण यंत्र भेट दिले.

या कार्यक्रमासाठी अस्मित फौंडेशनचे संस्थापक हनुमंत घायले, श्री कॉमर्स क्लासचे संचालक संतोष भोईर, राबगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता वाळंज, सदस्य दीपक तांबेकर, सदस्या मनीषा भोईर, ग्रामप्रवर्तिका शिल्पा शिरवडकर, माजी मुख्याध्यापक शांताराम लहाने, पांडूरंग वालगुडे, तंटामुक्त अध्यक्ष आत्माराम भोईर, नरेश भोईर, आदीसह शाळेतील शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: The former students made the school digital