चार दिवसांत जुगार, दारू अड्डे पोलिसांकडून उद्‌ध्वस्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

लाखोंचा ऐवज जप्त : 602 शस्त्रे ताब्यात 

रत्नागिरी: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी, जुगार अड्डे, दारू अड्डयांवर धाडसत्र सुरू केले आहे. त्यात दोन लाखांची दारू, तीन जुगार अड्डे, सात हजारांचा गांजा आणि अडीच लाख रुपयांची विनापरवाना शस्त्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. ही कारवाई 11 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत पोलिसांच्या पथकाने केली आहे. 

निवडणूक कालावधीमध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस खातेही सजग असते. त्यासाठी संवेदनशील ठिकाणांवर करडी नजर ठेवली जाते. सीआरपीसी 107 अन्वये 147, सीआरपीसी 109 अन्वये 5, तर सीआरपीसी 110 अन्वये 10 कारवाई केल्या आहेत. 149 अन्वये 483 जणांना नोटीस बजाविण्यात आली आहे. दारू अड्ड्यांवर टाकलेल्या 92 धाडीत 5,063 लिटर दारू जप्त केली. त्याची किंमत दोन लाख 742 रुपये होते. तीन जुगार अड्डे उद्‌ध्वस्त करत 2,653 रुपये जप्त केले. शस्त्र कारवाईमध्ये एका चारचाकीसह दोन लाख 40 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यात 20 हजारांची बारा बोअर काडतुसाच्या 49 इंची ऍल्युमिनिअमच्या दोन नळ्या, 600 रुपयांच्या चार काडतुसांचा समावेश आहे. रत्नागिरी शहर पोलिसांनी सात हजार रुपयांचा 563 ग्रॅम गांजा पकडला. 

जिल्ह्यात एकूण 20 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, 18 हजार 813 व्यक्‍तींची तपासणी केली. निवडणूक बंदोबस्तासाठी 115 पोलिस अधिकारी, 1,455 कर्मचारी व 400 होमगार्ड आणि एसआरपीएफच्या दोन प्लाटून मागविण्यात आल्या आहेत. तसेच 602 शस्त्रे निवडणूक कालावधीत ताब्यात घेण्यात आली आहेत.  

Web Title: four days Drugs crime police