चौदा वर्षात 256 मेट्रीक टन हापूस थेट परदेशात 

In fourteen years 256 metric tons of Hapus directly send abroad
In fourteen years 256 metric tons of Hapus directly send abroad

रत्नागिरी - इंग्लडसह युरोपीय देश, अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये रत्नागिरीच्या हापूसला मोठी मागणी आहे. मॅंगोनेटमुळे निर्यातदार थेट बागायतदारांकडे जात आहेत. निर्यातीपूर्वी आवश्‍यक प्रक्रिया रत्नागिरीतच करण्यासाठी नाचणे येथे आंबा प्रक्रिया केंद्र उभारले आहे. 2006 पासून 2020 पर्यंत केंद्रातून 256 मेट्रिक टन आंबा निर्यात करण्यात आला आहे तसेच 820 मेट्रिक टन आंब्यावर प्रक्रिया करून दर्जेदार फळं बाजारात ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे. 

कृषी निर्यात धोरणांतर्गत कृषी पणन मंडळ व अपेडा यांच्या अर्थसाहाय्याने निर्यात सुविधा केंद्र रत्नागिरीत नाचणे येथे 2004 साली उभारण्यात आले. आंतरराष्ट्रीय देशांच्या निकषानुसार युरोपीय देश, साउथ कोरिया, रशिया, मॉरिशस, इराण या देशांना निर्यात करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या उष्ण जलप्रक्रिया निर्यात सुविधा केंद्रात उपलब्ध आहेत. जपान, न्यूझीलंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांना निर्यातीसाठी प्रामुख्याने व्हीएचटी आणि विकीरण सुविधा वाशीत उपलब्ध आहे. तिथे आंबा पाठविण्यापूर्वी करावी लागणारी प्राथमिक प्रक्रिया रत्नागिरीत उपलब्ध आहे. यामध्ये हाताळणी कमी झाली असून फळाचा दर्जा टिकवणे शक्‍य होत आहे. या केंद्रात प्रशितकरण, शीतगृह, रायपनिंग चेंबर, हाताळणी यंत्रणा, प्रतवारी व पॅकिंग यांची अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध आहे. 

रत्नागिरीतील केंद्रातून 2006 ला पहिल्या वर्षी येथून 9.5 मेट्रिक टन आंबा निर्यात झाला. 2007 साली 39.02 मेट्रिक टन, 2009 ला 41 मे. टन निर्यात झाली. त्यानंतर दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात निर्यात सुरू झाली. 2019-20 ला 32.70 मेट्रिक टन आंबा निर्यात झाला. गतवर्षी कोरोनामुळे मोठा फटका बसला. 1.5 मे. टन आंबाच निर्यात झाला. 2006 ते 2020 या चौदा वर्षांच्या काळात 256 मे. टन आंबा निर्यात झाला. तसेच 820 मेट्रिक टन आंब्यावर प्रक्रिया करून तो देशाच्या विविध भागातील विक्रेत्यांकडे पाठविण्यात आला. सध्या हे केंद्र सद्‌गुरू एंटरप्रायझेसकडे चालवण्यास दिले आहे. 

स्थानिक शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी निर्यातदारांचा शोध घ्यावा लागत नाही. मालावर प्रक्रिया करून देतानाच निर्यातदारही उपलब्ध करून देण्यासाठी एंटरप्रायझेस काम करते. युरोपसह दुबई आणि कॅनडाला आंबा पाठविला आहे. आमच्या शाखा असल्यामुळे निर्यातदारांची साखळी तयार आहे. त्याचा रत्नागिरीतील बागायतदारांना फायदा होईल. 
- विश्‍वपाल मोरे, प्रक्रिया केंद्र, चालक 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com