सुविधां अभावी रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा देवून जनतेची फसवणुक

गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

बोर्डी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा गावातील उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिल्याचे दाखवुन आय. आर. बी कंपनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक करीत असल्याचा आरोप मानव अधिकार समितीचे अध्यक्ष हरबंससिंग नन्नारे यांनी केला आहे.

बोर्डी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा गावातील उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिल्याचे दाखवुन आय. आर. बी कंपनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक करीत असल्याचा आरोप मानव अधिकार समितीचे अध्यक्ष हरबंससिंग नन्नारे यांनी केला आहे.

महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीया सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर ट्रामा सेंटर स्थापन करण्यात यावी अशी तरतुद करण्यात आली आहे.  मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गेली अनेक वर्षे झाली परंतू ट्रामा सेंटर स्थापन करण्यात आलेले नव्हते पालघर जिल्हा मानव अधिकार परिषदेचे अध्यक्ष हरबंससिंग नन्नारे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आय. आर. बी कंपनीकडे सातत्यांने पाठपुरावा केला होता. अखेर आय. आर. बी कंपनीने नुकतेच डहाणू तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या कासा गावातील महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिला.

''फक्त रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ट्रामा सेंटरचा बॅनर लावून भागणार नाही. रुग्णांसाठी उपयुक्त औषधं, अद्यावत आॉपरेशन थिएटर, आवश्यक यंत्रणा, सर्व प्रकारच्या विषयाचे निष्णात डॉक्टर, परिचारीका, रक्तपेढी, चोवीस तास विद्युत पुरवठा अशा अत्यावशक सेवा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र आय. आर. बी कंपनीने प्रवेशद्वारांवर बॅनर लावण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात दुर्लक्ष केल्याने ट्रामा सेंटर मध्ये आलेल्या रुग्णाला गुजरात राज्यातील रुग्णालयाचा आधार घेण्याची पाळी येते.'' , अशी खंत हरबंससिंंग याांनी व्यक्त केली.

Web Title: fraud by giving Trauma center status to hospital