उदय सामंत, शेखर निकमांच्या मैत्रीत मिठाचा खडा

उदय सामंत, शेखर निकमांच्या मैत्रीत मिठाचा खडा

चिपळूण - आमदार सदानंद चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत हजर राहिले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांचे नाव न घेता त्यांच्यावर राजकीय निशाणा साधला. सामंत आणि निकम यांच्यात राजकारणापलिकडची मैत्री होती. मात्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात या मैत्रीत मिठाका खडा पडल्याचे बोलले जात आहे. 

उदय सामंत राष्ट्रवादीत असताना आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी धडपडत होते. मात्र 2009 मध्ये आघाडीचे सरकार आल्यानंतर पक्षाने गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना मंत्रीपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले. त्यानंतर जाधवांच्या विरोधात जिल्ह्यातून तक्रारींची मोहीम सुरू झाली. शेखर निकम यांनी भास्कर जाधव यांचा विरोध पत्कारून सामंत यांना मंत्रीपद मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला.

पक्षाने जाधवांना बढती दिली. मात्र निकम यांच्यामुळे सामंत यांना दिड वर्षासाठी राज्यमंत्रीपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. पक्षातील लोक आपला पराभव करणार असल्याचे समजल्यानंतर सामंत यांनी 2014 च्या निवडणूकीत राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला.

निकमांच्या विरोधी सदानंद चव्हाण यांना विजयासाठी मदत केली. हे सर्व माहिती असताना सामंत आणि निकम यांचे मैत्रीचे संबंध कायम होते. मात्र अलीकडच्या काळात या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात होते. चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्याला पुष्टी मिळाली. 

काय म्हणाले उदय सामंत 

आमदार सदानंद चव्हाण यांच्या समोर जे उभे राहणार आहेत त्यांना जिंकण्याची सवयच नाही. नेहमी पडण्याची आणि हरण्याची सवय आहे. अगदी छोट्या निवडणुकीत देखील ते पडतात. त्यामुळे चव्हाण यांना चिंता करण्यासारखे काहीच नाही. त्यांचा यावेळचा विजय हा विक्रमी असेल. ते 30 हजाराहून अधिक मताधिक्याने विजय संपादन करतील

शेखर निकम यांची प्रतिमा स्वच्छ असल्यामुळे त्यांच्यावर टिका करण्यासाठी विरोधकांकडे मुद्दाच नाही. बारीक, सारीक टिकांकडे निकम लक्षही देणार नाहीत. 2019 च्या निवडणूकीत विजय आमचाच असेल. 
- नितीन ठसाळे,
पंचायत समिती सदस्य चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com