बंद प्रकल्पांसाठी निधी देणार - जयकुमार रावल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

सावंतवाडी - शहराला पर्यटनदृष्ट्या मोठे महत्त्व लाभलेले आहे. यामुळे शहराचा विकास होण्यासाठी या ठिकाणी बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. यात शिल्पग्राम, जुन्या वाड्याचे पुनरुज्जीवन, नरेंद्र डोंगरावर रोप वे, ट्री हाउस प्रकल्प राबविण्यात येणार आहे, असे आश्‍वासन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी येथे दिले.

येथे दौऱ्यावर असलेल्या श्री. रावल यांनी काल सायंकाळी उशिरा पालिकेला भेट दिली. या वेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते त्यांचे स्वागत झाले. 

या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, अनारोजीन लोबो, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, दीपाली सावंत, भारती मोरे, माधुरी वाडकर आदी उपस्थित होते. 
श्री. रावल म्हणाले, ‘‘सावंतवाडी शहराला संस्थानकालीन महत्त्व आहे.

यामुळे या ठिकाणी राजघराण्याची मदत घेऊन संस्थानचा इतिहास जगापुढे मांडण्यात येणार आहे. या ठिकाणी पालकमंत्री केसरकर यांनी शहरातील प्रकल्प बंदावस्थेत असल्याचे सांगितले. ते प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्‍यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहराला सौंदर्य भरभरून मिळाले आहे. 

यामुळे या ठिकाणी येणारे पर्यटक रुळावेत यासाठी मोती तलावाच्या बाजूला सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहे. तसेच अन्य काही प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.’’ 

नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, ‘‘शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील अन्य शहरांच्या तुलनेत आम्ही दहा वर्षे पुढे आहोत; परंतु या ठिकाणी उभारण्यात आलेले प्रकल्प केवळ शासनाचे भाडे जास्त असल्यामुळे सुरू होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्या प्रकल्पाचे भाडे कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.’’ 

मुख्याधिकारी श्री. द्वासे यांनी प्रास्ताविक केले. सौ. कोरगावकर यांनी आभार मांडले.

बोलले म्हणाले
* शिल्पग्रामचे पुनरुज्जीवन करण्यासाठी निधी देणार
* नरेंद्र डोंगरावर ट्री हाउससारखा प्रकल्प उभारणार
* भोसले उद्यानाचे नूतनीकरण करण्यात येणार
* आंबोलीत ॲडव्हेंचर टूरिझम संकल्पना राबविणार
* नरेंद्र डोंगरातून शहरात रोपवेसाठी प्रयत्न करणार
* शहरातील संस्थानकालीन वाड्याचे पुनरुज्जीवन करणार

Web Title: fund gives to close project