माझ्यातच निधी आणण्याची धमक - नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

कणकवली - ‘विरोधकांकडे विकासाचा एकही मुद्दा नसल्याने ते केवळ माझ्यावर आरोप करत आहेत. विकास करायची ज्यांची कुवत नाही त्यांनी माझ्यावर बोलू नये. कणकवलीच्या विकासासाठी लागणारा निधी मीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आणू शकतो. तेवढी माझ्यात धमक आहे,’ अशी प्रतिटीका खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत करून कणकवलीच्या निवडणुकीत स्वाभिमानचा नगराध्यक्ष सहाशे मताधिक्‍याने निवडून येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेससह १३ नगरसेवक स्वाभिमानचेच असतील, असा दावाही त्यांनी केला. येथील हॉटेल निलममध्ये राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर प्रतिहल्ला केला.

कणकवली - ‘विरोधकांकडे विकासाचा एकही मुद्दा नसल्याने ते केवळ माझ्यावर आरोप करत आहेत. विकास करायची ज्यांची कुवत नाही त्यांनी माझ्यावर बोलू नये. कणकवलीच्या विकासासाठी लागणारा निधी मीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आणू शकतो. तेवढी माझ्यात धमक आहे,’ अशी प्रतिटीका खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत करून कणकवलीच्या निवडणुकीत स्वाभिमानचा नगराध्यक्ष सहाशे मताधिक्‍याने निवडून येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेससह १३ नगरसेवक स्वाभिमानचेच असतील, असा दावाही त्यांनी केला. येथील हॉटेल निलममध्ये राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर प्रतिहल्ला केला. या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदीप कुडतरकर, तालुकाध्यक्ष सुरेश सावंत आदी उपस्थित होते. 

ते म्हणाले,‘‘कणकवलीची निवडणूक ही शहर विकासाची आहे. या शहरासाठी तुम्ही काय देणार ते जनतेला सांगा; मात्र ज्यांची पात्रता नाही ते वाटेल ते बडबडत आहेत. दिल्लीत आणि राज्यात कोणाचे चालते हे जनतेला माहीत आहे. माझी ताकद असल्यानेच मी खासदार झालो. तुम्हाला ते का शक्‍य झाले नाही. माझ्या कर्तुत्वाच्या जवळपास येण्याची लायकीही विरोधकांची नाही. शहराच्या विकासासाठी निधी आणण्याची धमक माझ्यात आहे.

यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करीन. माझा खासदार फंड पाच कोटीचा आहे. त्यामुळे विरोधक म्हणून जे प्रमोद जठार बोलत आहे ते कुठून निधी आणणार. केवळ निवडणुका आल्या की राणेंना टार्गेट करायचे. जिल्ह्यातील विमानतळ मी आणला. केवळ विमान टेक अप घ्यायचे होते; मात्र तेही काम गेल्या साडेतीन वर्षात जमलेले नाही. पाटबंधारे प्रकल्पाला एकही रूपया मिळालेला नाही, सी-वर्ल्ड प्रकल्प ठप्प आहे. ओरोसचे आयटी पार्क, रेडी बंदर, दोडामार्गची एमआयडीसी मझ्या मंत्रीपदाच्या काळात आली. तुम्ही काय केले ते सांगा.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून दिले. त्यामुळे खरा मराठा आमच्या सोबत राहील असा विश्‍वास आहे; मात्र निवडणुकीत आपण जात-पात मानत नाही. मराठा समाजातील काही असंतुष्टांनी हे राजकारण केले. मी जातीचे राजकारण केलेले नाही.’’ यावेळी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांच्यावरही त्यांनी टिका केली. जे गैरमार्गाने काही धंदे करत आहेत त्यांचे फोटो आणि कर्तुत्व वेळ येईल तेव्हा मी नक्कीच जाहीर करीन, असेही राणे यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

Web Title: fund narayan rane