रत्नागिरीतील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर

मृतांच्या वारसांना २३ लाखांचे वाटप; खेड, चिपळुणातील अतिवृष्टी; मुख्यमंत्री सहाय्यता निधी
Akola Marathi News- Farmers will get Rs 25 crore for excess rainfall! Funds credited to Tehsildar's account
Akola Marathi News- Farmers will get Rs 25 crore for excess rainfall! Funds credited to Tehsildar's account

रत्नागिरी : अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसान भरपाई पोटी शासनाने ४७ कोटी ८३ लाख ५२ हजार इतका निधी वाटपास मंजुरी दिली असून रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित ७३५ शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ३९ लाख ९३ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी राज्य शासनाने ४७ कोटी ८३ लाख ५२ हजार इतका निधी विभागीय आयुक्तांमार्फत वितरीत करण्यास मान्यता देण्यात दिली आहे .यामध्ये कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील बाधित ११३४ शेतकऱ्यांसाठी ६८ लाख ९१ हजार रुपये इतका निधी देण्यात आला आहे.

Akola Marathi News- Farmers will get Rs 25 crore for excess rainfall! Funds credited to Tehsildar's account
शर्यतींच्या परवानगीसाठी लढा सुरूच; शेतकरी व रेस शौकिनांचा इशारा

रायगड जिल्ह्यातील २०५ शेतकऱ्यांच्या बाधित ६०. ५० हेक्टर क्षेत्रातील नुकसानीसाठी १० लाख ९७ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ७३५ शेतकऱ्यांच्या बाधित २१५.१९ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीसाठी ३९ लाख ९३ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९४ शेतकऱ्यांच्या बाधित १००.६७ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीसाठी १८ लाख १ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील खेड, चिपळूणमधील अतिवृष्टीतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १ लाखांची मदत देण्याचे काम प्रशासनाने सुरु केले आहे. आजपर्यंत यातील २३ लाखांचे वाटप पूर्ण झाले आहे. नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्यांच्या वारसांना १ कोटी ८ लाख रुपयांचे तर जखमींना १ लाख ५३ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.

आपत्तीत बाधित गावामध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे मोफत गहू आणि तांदुळ पुरवठा करण्यात येत आहे. आजपर्यंत २०७ गावांतील ६ हजार ४४६ कुटुंबांना ६४४.६० क्विंटल गहू आणि ६४४.६० क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे. बाधितांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात येत आहे. यात ऑनलाईन पद्धतीने आजपर्यंत ५० हजार ३८६ व ऑफलाईन पद्धतीने ३ हजार १२१ अशा एकूण ५३ हजार ५०७ शिवभोजन थाळींचे वाटप झाले आहे. तसेच ६४ बाधित गावांतील २ हजार ५६० कुटुंबांना १२ हजार ८०० लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com