जिवा फुड कंपनीविरोधात गजानन वाडेकरांचे आमरण उपोषण

अमित गवळे
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पाली - सुधागड तालुक्यातील करंजघर येथील जिवा फुडस प्रा.लि. मशरुम कंपनी विरोधात गजानन वाडेकर रा. करंजघर सोमवार (ता.27) पासून पाली तहसिलकार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. तर एकीकडे कंपनीच्या बाजूने कंपनीचे कामगावर एकवटले आहेत. त्यामुळे आता नक्की कोणाच्या बाजूने निर्णय द्यावा याबाबत प्रशासन दुहेरी पेचात सापडले आहे.

यासंदर्भात प्रशासनामार्फत अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याने बुधवारी (ता.29) तिसर्‍या दिवशी गजानन वाडेकर यांची प्रकृत्ती खालावली आहे. पाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुत्सम दामले यांनी उपोषणकर्त्यांच्या तपासणी केली. 

गजानन वाडेकर यांनी तब्बल 10 महिण्यापासून जिवा फुड कंपनीवरोधात कारवाईच्या मागणीसाठी स्थानिक व जिल्हा प्रशासनासह मंत्रालयस्तरावर पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान जिवा फुड मशरुम कंपनीतील कामगारांनी कंपनीत मिळालेल्या रोजगारातून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असल्याने कंपनी बंद करु नये अशी मागणी निवेदनाद्वारे पाली तहसिलदार बि.एन.निंबाळकर यांच्याकडे केली आहे. गजानन वाडेकर यांनी केलेल्या तक्रारीत जिवा फुडस कंपनीत उत्पादीत होणार्‍या मशरुमच्या प्रक्रीयेदरम्यान परिसरात असह्य दुर्गंधी पसरत असल्याने नागरीकांच्या जिवितास धोका निर्माण झाला असल्याचे म्हटले आहे. तसेच कंपनीच्या विस्तारीकरणादरम्यान शासन नियम धाबेवर बसवून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत असल्याचा आरोप करीत जिवा फुडस कंपनीवर शासन प्रशासनामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात यावी, सदर बांधकाम हटविण्यात यावेत या मागण्या केल्या आहेत.  जोपर्यंत जिवा फुड मशरुम कंपनीतील विनापरवाणा करण्यात आलेल्या बांधकामावर हातोडा पडत नाही व मागणी नुसार प्रत्यक्षात कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरुच राहिल असा इशारा उपोषणकर्ते वाडेकर यांनी दिला आहे. 

जिवा फुड मशरुम कंपनीतील अनधिकृत बांधकामावर प्रशासनामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. परंतू उपोषणकर्त्यांनी अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी केली असून सदर कारवाई करण्याचे अधिकार माझ्या अखत्यारीत नाहीत. त्यामुळे मा. रायगड जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी रोहा यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तसेच जिवा फुड मशरुम कंपनीचे अधिकार्‍यांना चर्चेस निमंत्रीत केले असून ते अद्याप आले नाहीत. 
बि.एन. निंबाळकर, तहसिलदार, पाली सुधागड 

Web Title: Gajanan Wadekar's fast against Jiva Food Company