Ganeshotsav 2023 : चाकरमान्यांनी धरली कोकणाची वाट; गणेश भक्तांनी रेल्वेस्टेशन हाउसफुल्ल, एसटी-खासगी बसेसनाही प्रचंड गर्दी

कुटुंबासह गावाकडे जायला निघालेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे.
Chiplun Railway Station Konkan Ganeshotsav
Chiplun Railway Station Konkan Ganeshotsavesakal
Updated on
Summary

गणपती स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक दुसऱ्या दिवशी कोलमडले आहे. अनेक गाड्या अर्धा ते ४ तासांपर्यंत उशिराने धावत आहेत.

चिपळूण : गणेशोत्सवासाठी (Konkan Ganeshotsav) चाकरमान्यांनी कोकणाची वाट धरली आहे. त्यामुळे चिपळूण रेल्वे स्थानकावर (Chiplun Railway Station) गावाला येणाऱ्या चाकरमान्यांची प्रचंड गर्दी झाली आहे.

गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्या सोडल्या आहेत. मात्र, या रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचा खोळंबा होत आहे. दुसरीकडे एसटी आणि खासगी बसेसनाही प्रचंड गर्दी झाल्याने चाकरमान्यांची रखडपट्टी झाली आहे.

Chiplun Railway Station Konkan Ganeshotsav
Eknath Shinde : मनोज जरांगेंची मागणी असली, तरी मराठ्यांना OBC तून सरसकट आरक्षण मिळणार नाही; CM शिंदेंचं मोठं विधान

कुटुंबासह गावाकडे जायला निघालेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे. गणपती स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक दुसऱ्या दिवशी कोलमडले आहे. अनेक गाड्या अर्धा ते ४ तासांपर्यंत उशिराने धावत आहेत. कोकणकन्या, तुतारी, मेंगलोर एक्स्प्रेस, कुडाळ गणपती स्पेशल, दिवा – रत्नागिरी या गाड्या विलंबाने धावत आहेत.

Chiplun Railway Station Konkan Ganeshotsav
Ganeshotsav 2023 : मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ; कशेडी बोगद्यातून एकेरी वाहतूक, पोलिसांकडून कोंडी फोडण्याचा प्रयत्न

मुंबईकडून तळकोकणात येणाऱ्या मार्गावर अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. वीरपासून तळकोकणापर्यंत कोकण रेल्वेचा सिंगल ट्रॅक आहे. मुंबईहून तळ कोकणात जाण्यासाठी रेल्वेने १२ तास लागत आहे. चार तास गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकावरच चार तास खोळंबून राहावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ganeshotsav Special ST Bus And Railway
Central Railway 246 Ganpati Special Trains for Konkan booking starts from 1 August 2026
Dabhol creek fish market latest news
Ganeshotsav 2026: Thane Enhances Konkan Railway Ticket Booking with Additional Counters
Marathi News Esakal
www.esakal.com