गणेशोत्सवासाठी आगाऊ रेल्वे आरक्षणाची तयारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

कणकवली - कोकणातील चाकरमान्यांना यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वे आरक्षणाची तयारी सुरू झाली आहे. यंदा २५ ऑगस्टला गणेश चतुर्थी असल्याने रेल्वेच्या नव्या नियमानुसार १२० दिवसांचे आगाऊ आरक्षण एप्रिल महिन्यात होणार असल्याने नियमित धावणाऱ्या गाड्यांकडे प्रवाशांचा कल वाढला आहे. रेल्वेने प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी नवे नियम लागू केल्याने कन्फर्म तिकिटासाठी गणेशभक्त प्रयत्नशील राहणार आहेत.

कोकणात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. सिंधुदुर्गात तर ६५ हजार घरगुती गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होते. त्यामुळे मुंबईसह देश-विदेशांतील लाखो गणेशभक्त आपल्या गावाकडे येतात. त्यासाठी रेल्वे हा चांगला पर्याय आहे. यंदा सर्वसाधारण १९ ऑगस्टपासून भाविक आपल्या गावाकडे दाखल होणार आहेत. त्यामुळे १९ ऑगस्टचे रेल्वे आरक्षण २१ एप्रिलला, २० चे २२ एप्रिलला तसेच २४ ऑगस्टचे २६ एप्रिलला आणि गणेशोत्सवाच्या दिवशी म्हणजेच २५ ऑगस्टचे आरक्षण २६ एप्रिलला होणार आहे. यंदा ५ सप्टेंबरला अनंतचतुर्दशी असून त्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागणार आहेत; परंतु बहुतांशी चाकरमानी दीड, पाच, सात, नऊ दिवसांनी गणेशमूर्तींचे विसर्जन करून आपल्या चाकरीच्या ठिकाणी जातात, तर काही चाकरमानी गौरीसाठी विशेष करून गावाकडे येतात. त्यामुळे कुटुंबासह गावाकडे येत असताना आगाऊ आरक्षण केले जाते.

याची तयारी चाकरमान्यांनी सुरू केली आहे. सोशल मीडियावरून गेले आठ दिवस या आगाऊ तारखा शेअर केल्या जात आहेत. भारतीय रेल्वेने आरक्षणासंबंधी नवे नियमही लागू केले आहेत. त्यानुसार वेटिंग लिस्टच्या मर्यादा कमी केल्या आहेत. तत्काळ तिकीट रद्द केल्यास ५० टक्के परतावा मिळतो. नव्या नियमाचा फटका आपणाला बसू नये म्हणून कन्फर्म आगाऊ तिकीट मिळविण्यासाठी पुढील आठवड्यापासून चाकरमान्यांची लगबग सुरू होणार आहे.

Web Title: ganeshotsav railway reservation