esakal | प्रसंगावधान राखत ग्रामस्थांनी वाचवली हर्णे बंदरातील नौका
sakal

बोलून बातमी शोधा

प्रसंगावधान राखत ग्रामस्थांनी वाचवली हर्णे बंदरातील नौका

मुसळधार पाऊस, वाऱ्याचा वेगाने लाटांच्या तडाख्यामुळे रात्री २ वाजण्याच्या सुमारास नौका भरकटू लागली.

प्रसंगावधान राखत ग्रामस्थांनी वाचवली हर्णे बंदरातील नौका

sakal_logo
By
राधेश लिंगायत

हर्णे : मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे हर्णे बंदरातील गंगेश्वरी नौका भरकटुन बुडत असतानाच ग्रामस्थांनी धावपळ करून नौका वाचवली. परंतु लाटांच्या दणक्यामुळे भरपूर तोडफोड झाल्याने नौकेचे नुकसान झाले आहे. सुदैवाने गोवर्धन पावसे यांना या अपघातात कोणतीही ईजा झालेली नाही.

शासनाने ५ तारखेपासून वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिला होता. वाऱ्याचा वेगही ताशी ४० ते ५० किमी वेगाने असण्याची शक्यता वर्तवली होती. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी हलवाव्या अशा सूचना दिल्यानंतर हर्णे बंदरातील किमान २० ते २५ नौकांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याचा आसरा घेतला.

हेही वाचा: पालगड गणेशोत्सवासाठी मुंबईच्या गव्हर्नरची सनद

काल (६) रोजी सायंकाळी पावसाने जोरदार सुरुवात केली. संपूर्ण रात्रभर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. हर्णे येथील मच्छीमार गोवर्धन पावसे यांची गंगेश्वरी नौका किल्ल्याच्या आडोशाला होती. मुसळधार पाऊस, वाऱ्याचा वेगाने लाटांच्या तडाख्यामुळे रात्री २ वाजण्याच्या सुमारास नौका भरकटू लागली. जवळच असलेल्या नौकेचा दोरखंड पंख्यात अडकल्याने इंजिन चालु करता येत नव्हते.

आंजर्ले खंडित जाण्याची सोयच नसल्याने नुकतीच एक नौका बुडाली होती. लाटांचे तडाख्याने नौका हर्णे स्मशानभूमी समोर येऊन कलंडली तिला तिथेच जलसमाधी मिळण्याची शक्यता होती. मात्र परिसरातील मच्छीमार बांधव गेले, चारही बाजूने कलंडलेली नौका दोरखंडाच्या साहाय्याने ओढून सरळ केली. बंद पडलेले इंजिन चालू करून थेट आंजर्ले खाडीत सुरक्षित ठिकाणी नेली. सर्वांच्या प्रयत्नाने नौकेची जलसमाधी झाली नाही. निव्वळ कित्येक वर्षांच्या रखडलेल्या जेटीच्या प्रस्तावामुळे येथील मच्छीमारांवर हे प्रसंग उद्भवतात.

हेही वाचा: सदाभाऊ खोत यांच्या मुलाकडून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला मारहाण

सुरक्षित ठिकाणी म्हणून आंजर्ले खाडी विचार केला जातो. मात्र मुखावर प्रचंड गाळ साचतो त्यामुळे मच्छीमारांनी हे असेच प्रसंग झेलायचे का? असे संतापजनक प्रश्न मच्छीमारांकडून विचारले जात आहेत.या मच्छीमारांवर आपत्ती येते तेव्हा मत्स्यव्यवसाय काय किंवा आपत्ती व्यवस्थापन असो कोणीही मदतीकरीता हजर नसते याबाबत मच्छीमार बांधव संताप व्यक्त केला आहे.

loading image
go to top