Ganesh Festival 2026 Konkan Railway booking
esakal
रत्नागिरी : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी चाकरमान्यांच्या मनात आतापासूनच बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. यंदा गावी जायला रेल्वेचं तिकीट मिळेल ना, या काळजीने चाकरमान्यांना वेध लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे रेल्वे आरक्षणाचा मोठा प्रश्न यंदाही (Konkan Railway Ganpati reservation dates) असून, गणेशोत्सवासाठी रेल्वे आरक्षणाच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. येत्या १३ जुलैपासून पहिल्या टप्प्यातील बुकिंगला सुरुवात होत आहे.