Ganpatipule Beach Closed : गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना बंदी! उदय सामंतांच्या सूचनेनंतर प्रशासनाकडून कडक पाऊल, अरबी समुद्रानं धारण केलंय रौद्ररूप

Ganpatipule Beach sea entry ban : मुसळधार पाऊस आणि अरबी समुद्रातील उंच लाटांमुळे गणपतीपुळे किनाऱ्यावर पर्यटकांना समुद्रात उतरण्यास बंदी घालण्यात आली असून, पोलिस व प्रशासनाने सुरक्षेसाठी कडक उपाययोजना केल्या आहेत.
Ganpatipule Beach sea entry ban

Ganpatipule Beach sea entry ban

esakal

Updated on

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळीवाऱ्यामुळे अरबी समुद्राला मोठे उधाण आले (Ganpatipule Beach latest news) आहे. समुद्राचे रौद्ररूप आणि वाढती लाटांची तीव्रता पाहता, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गणपतीपुळे किनाऱ्यावर पर्यटकांना समुद्रात उतरण्यास बंदी घातली आहे. शासकीय विश्रामगृह ते गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राच्या मागील बाजूपर्यंतच्या संपूर्ण किनारपट्टीवर दोऱ्या बांधून पर्यटकांना समुद्रात उतरण्यास मज्जाव केला आहे. पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या सूचनेनंतर तत्काळ याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com