

MLA Nilesh Rane addressing Gavrai villagers; vows funds for all-round development.”
Sakal
सिंधुदुर्गनगरी: गावराई सरपंच सोनल शिरोडकर यांच्यावरील चुकीच्या पद्धतीने आणि स्वार्थ बुद्धीने सदस्यांनी घातलेला अविश्वास ठराव मतदार ग्रामस्थांनी फेटाळून लावत महिला सरपंचाचा सन्मान राखला आहे. ग्रामस्थांनी सत्याच्या बाजूने मतदान केले. यापुढेही सरपंचांच्या व शिंदे शिवसेनेच्या पाठीशी राहून गावराई गावचा सर्वांगीण विकास करून घ्या. त्यासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार नीलेश राणे यांनी विजयोत्सव कार्यक्रमात केले.