esakal | साहित्य क्षेत्रावर शोककळा; गझलकार मधुसुदन नानीवडेकर यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्य क्षेत्रावर शोककळा; गझलकार मधुसुदन नानीवडेकर यांचे निधन

साहित्य क्षेत्रावर शोककळा; गझलकार मधुसुदन नानीवडेकर यांचे निधन

sakal_logo
By
एकनाथ पवार

वैभववाडी : जेष्ठ कवी आणि सुप्रसिध्द गझलकार मधुसुदन नानीवडेकर (madhusudan naniwadekar) यांचे रविवारी (ता. ११) पहाटे तळेरे येथे हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील (sindhudurg district) साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले होते. त्यांच्या 'चांदणे नदीपात्रात' (chandane nadipatrat) या काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वैभववाडी (vaibhaw vadi) तालुक्यातील नानीवडे येथील श्री. नानीवडेवर हे सध्या तळेरे येथे राहत होते. आज पहाटे त्यांना राहत्या घरी हृदय विकाराचा झटक आला. त्यामध्येच त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर अत्यंविधी करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक, साहित्यीक क्षेत्रातील अनेक लोक उपस्थित होते.

नानीवडेकर हे गेली अनेक वर्ष साहित्य क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी शेकडो कविता लिहल्या आहेत. तर त्यांचे कित्येक गझल लोकप्रिय आहेत. २००४ मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह चांदणे नदीपात्रात हा प्रकाशित झाला होता. या काव्यसंग्रहाला सन्मानाचे अनेक पुरस्कार मिळाले. एक प्रतिभाबंत कवी म्हणुन त्यांची राज्यभर ओळख होती. परंतु उत्तम गझलकार म्हणुन त्यांनी एक वेगळी प्रतिमा साहित्य क्षेत्रात निर्माण केली होती. त्यांचे अनेक गझल गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी गायिले आहेत. त्यांची 'निघायला हरकत नाही' ही गझल खुप गाजली.

हेही वाचा: चिंताजनक! पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील कोरोनाची दुसरी लाट ओसरेना

गझल प्रांतात त्यांना प्रसिध्द गझलकर सुरेश भट यांचे वारसदार म्हणुन ओळखले जात होते. कोकण मराठी साहीत्य परिषदेचे कामही त्यांनी जोमाने केले. तालुकानिहाय परिषदेच्या शाखा निर्माण करण्यात त्यांचा सिहांचा वाटा होता. त्यांनी गझलांचे शेकडो कार्यक्रम राज्याच्या कानाकोपऱ्यात झाले आहेत. गेली तीस वर्ष ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. आज पहाटे त्याचे निधन झाल्याची माहीती सर्व राज्यभर पसरताच साहीत्य क्षेत्रावर शोककळा पसरली.

कवी चेतन बोडेकर यांच्या मालवणी कविता संग्रह गावय, साठी कवी श्री. नानीवडेकर यांनी प्रस्तावना द्यावी अशी विनंती करण्यात आली. परंतु मालवणी कविता संग्रहाला प्रस्तावना देण्याचा अधिकार हा वस्त्रहरणाचे लेखक गंगाराम गवाणकर अर्थात नानांचा आहे असे सांगत त्यांनी त्यांच्याशी सपंर्क साधला, आणि त्या कविता संग्रहाला त्यांच्याकडुन प्रस्तावना घेतलीच आणि प्रकाशनही त्यांच्याच हस्ते होण्यासाठी पुढाकार घेतला.

हेही वाचा: लोकसंख्या वाढीचे प्रमाण घटणार? आरोग्य विभागाचा अंदाज

loading image