esakal | चिंताजनक! पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील कोरोनाची दुसरी लाट ओसरेना
sakal

बोलून बातमी शोधा

चिंताजनक! पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील कोरोनाची दुसरी लाट ओसरेना

चिंताजनक! पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील कोरोनाची दुसरी लाट ओसरेना

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : राज्यातील इतर जिल्ह्यांत कोरोना साथीची (covid-19) दुसरी लाट ओसरत असताना आठ जिल्ह्यांत मात्र कोरोनाचा विस्फोट कायम आहे. त्यातही कोरोनाबाधितांचे कोल्हापुरातील (kolhapur) प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. शुक्रवारपर्यंत (९) जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण १०.२४ इतके असून दुसऱ्या क्रमांकावर सातारा (९.१४) तर तिसऱ्या क्रमांकावर सांगली (८.८१) आहे. आज कोल्हापुरात २१ हजार ४९२ चाचण्या घेण्यात आल्या असून १६१४ नवे रुग्ण आढळले. बाधितांचे शनिवारचे प्रमाण ७.५० टक्के होते.

जिल्ह्यात दुसरी लाट फेब्रुवारीत सुरू झाली. मार्च, एप्रिलच्या तुलनेत मेमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा कहरच सुरू होता. मेमध्ये जिल्ह्यात सुमारे ४२ हजार बाधित आढळले, तर १३७८ जणांचा मृत्यू झाला. मेच्या तुलनेत जूनमध्ये प्रमाण कमी झाले असे वाटत असतानाच २७ जूनपासून पुन्हा कोल्हापुरात बाधितांची संख्या वाढतच राहिली आहे. चाचण्या वाढल्या तशी बाधितांची संख्याही वाढली. कोरोना नियमांचे होत असलेले उल्लंघन हेच बाधितांची संख्या वाढीला कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

हेही वाचा: खचायचं नाही, लढायचं : अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले तरी कृषी केंद्रातून सेवा

कोल्हापूरसह सांगली, (sangli) सातारा (satara) व पुणे जिल्ह्यातील संसर्ग जूनच्या पहिल्या आठवड्यात काही अंशी घटला होता; पण १२ जूननंतर कोल्हापुरात पुन्हा बाधितांच्या संख्येत वाढ होत राहिली. १२ जूनला तर तब्बल २२७४ बाधित आढळले तर ५८ मृत्यू झाले होते. त्यानंतर आजअखेर बाधितांचा हा आलेख चढताच राहिला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत कोल्हापुरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूत घट झाली असली तरी बाधितांच्या संख्येत मात्र वाढ कायम आहे. बाधितांपेक्षा बरे होऊन घरी जाणऱ्यांची वाढती संख्या मात्र जिल्ह्यात दिलासादायक आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १३ हजार ३३१ सक्रिय रुग्ण आहेत.

जिल्हे व टक्केवारी
कोल्हापूर - १०.२४
सातारा - ९.१४
सांगली - ८.८१
रायगड - ७.८८
पुणे - ७.६८
रत्नागिरी - ७.२९
सिंधुदुर्ग - ६.५५
पालघर - ५.२६
बुलढाणा- ४.१७

हेही वाचा: सार्वजनिक ठिकाणी मोफत WIFI वापरताय?; मग घ्या 'ही' काळजी

प. महाराष्ट्र, कोकण अद्याप करोनाग्रस्त

राज्यात सर्वाधिक १०.२४ टक्के बाधितांचे प्रमाण कोल्हापुरात आहे. त्या खालोखाल सातारा (९.१४ टक्के), सांगली (८.८१ टक्के), रायगड (७.८८ टक्के), पुणे (७.६८ टक्के), रत्नागिरी (७.२९ टक्के), सिंधुदुर्ग (६.५५ टक्के), पालघर (५.२६ टक्के) आणि बुलढाणा (४.५७ टक्के) या जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण अधिक आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्यांतील संसर्ग दर जूनच्या शेवटच्या आठवड्यात काही अंशी घटला होता. परंतु २७ ते ३ जुलै या आठवड्यात मात्र पुन्हा वाढला. कोल्हापूर आणि साताऱ्यातील बाधितांचे प्रमाण या आठवड्यात अनुक्रमे तीन आणि दोन टक्क्यांनी वाढल्यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

loading image