गीता भोईर यांना अंगणवाडी सेवेतील 'उत्कृष्ट कार्य पुरस्कार'

अमित गवळे
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील राबगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावठेवाडी येथील अंगणवाडी सेविका गीता वसंत भोईर यांना या वर्षाचा अंगणवाडी सेवेतील 'उत्कृष्ट कार्य पुरस्कार' मिळाला. सुधागड-पाली पंचायत समितीच्या वतीने नुकतेच त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अाहे.

गीता भोईर यांनी अापल्या अनेक वर्षाच्या सेवा काळात प्रामाणीकपणे व सुनोजितरित्या अापले कार्य अखडीतपणे केले आहे. सुधागड-पाली पंचायत समिती व एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या वतीने सन २०१७-१८ या वर्षांत तालुक्याच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका, तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस अशा एकूण तेरा जणांना उत्कृष्ट कार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान सोहळा सुधागड-पाली येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात पाली पंचायत समितीच्या सभापती साक्षी दिघे, उपसभापती उज्वला देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला. 

पुरस्कार विजेत्यांना मान्यवराचे हस्ते सन्मान चिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पाली पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी एस.एस.कवितके एकात्मिक बालविकास प्रकल्प पाली येथील सर्व अधिकारी व कर्मचारीवर्ग यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

Web Title: geeta bhoir awarded by good work for anganwadi