नव्या नोटा मिळवताना जर्मन पर्यटकाची छमछाक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

रत्नागिरी- दिवाळीच्या सुटीतील पर्यटकांच्या कोकणातील भटकंतीवर नोटाबंदीमुळे परिणाम झाला. याचप्रमाणे त्याचा फटका सध्या कोकणात सायकलवरून फिरणाऱ्या जर्मनीच्या महिला पर्यटकालाही बसला आहे. परदेशातील चलन बदलून घेण्याचा त्रास असतो. त्याच्या जोडीला भारतीय चलनाच्याच हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेताना तिची चांगलीच दमछाक झाली.

रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरलेली मलिना ही जर्मनीची महिला सायकलवरून भारतभ्रमण करत आहे. 16 नोव्हेंबरला ती मुंबईत आली. त्या वेळी भारतात पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद केल्याचे जाहीर झाले होते. तिच्याकडे पाचशे आणि हजार नोटांचे मिळून सहा हजार रुपये होते. पैसे सुटे करण्यासाठी किमान सात बॅंकांमध्ये ती गेली. प्रत्येक ठिकाणी तिला नकारघंटाच ऐकायला मिळाली. एका बॅंकेच्या व्यवस्थापकाने मदत केली. मात्र, केवळ दोन हजार रुपयेच बदलून मिळाले, असे तिने सांगितले. हे दोन हजार रुपये ती अत्यंत जपून वापरत आहे. त्यामुळे ती खरेदीही करू शकली नाही.

Web Title: german tourist suffers note exchange