राष्ट्रवादीने कुबड्या फेकून द्याव्यात : भास्कर परब

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

कुडाळ - आता बस्स झाल्या कुबड्या! कुबड्या घेऊन घेऊनच पक्षाचे अस्तित्व संपत आले आहे. त्यामुळे आता पक्षाने सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात किंवा संघटना बांधणी होत नाहीत तोपर्यंत निवडणुका लढवू नयेत, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांनी पत्रकातून व्यक्त केले.

कुडाळ - आता बस्स झाल्या कुबड्या! कुबड्या घेऊन घेऊनच पक्षाचे अस्तित्व संपत आले आहे. त्यामुळे आता पक्षाने सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात किंवा संघटना बांधणी होत नाहीत तोपर्यंत निवडणुका लढवू नयेत, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांनी पत्रकातून व्यक्त केले.

पत्रकात परब यांनी म्हटले आहे, की जिल्ह्यात राष्ट्रवादीने सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात किंवा पुढील लोकसभा, विधानसभा निवडणुकांपर्यंत संघटना बांधणीसाठी कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवू नये. राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून प्रत्येक निवडणुकीसाठी नेहमी सोईनुसार आघाडी-युती करण्यात आली. त्यातच पक्षाचे खच्चीकरण झाले. जिल्ह्यात आपली खरोखरच ताकद किती आहे याचा कधीच विचार केला नाही. त्यामुळेच सर्व विरोधी पक्ष राष्ट्रवादी पक्षाला पूर्णपणे कमी लेखून नेहमी पक्षाची हेटाळणी करतात. आज ग्रामीण भागातील प्रत्येक कार्यकर्त्याला आगामी निवडणुका एकतर स्वबळावर लढवा, नाहीतर संघटनात्मक दृष्ट्या आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीपर्यंत कुठचीही निवडणूक लढवू नये, संघटना बांधणीवर पुढील तीन वर्षे भर देवूया. आघाडी, युती करून अपयश आले तरी आणि यश आले तरी विरोधकांचे टोमणे खातच कार्यकर्ता नामोहरम होतो आणि त्यात पक्षाची वाताहात होते.

विरोधकांची बोलती बंद करण्यासाठीच स्वबळावर निवडणूक लढवूया. कुडाळ नगरपंचायतीत दहापैकी दोनच जागा लढविल्या; पण सतराही जागांवर राष्ट्रवादीने काम केले; पण रिझल्ट दोनचा काय, आला पराभव तोही दारुण. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने आपले घड्याळ हे चिन्ह सर्वप्रथम प्रत्येक गावागावात पोचविण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवा, अन्यथा तटस्थ राहावे. ही भूमिका माझी व्यक्तीशः कार्यकर्त्याच्या माध्यमातून कार्यकर्ता म्हणून मांडत आहे. ही भूमिका पक्षाची नाही, असे पत्रकात परब यांनी म्हटले आहे.

Web Title: Give away NCP help : Bhaskar Parab