गोव्याचे सिंधुदुर्गवासीयांना नेहमीच सहकार्य

पणजी-झोळंबे फेरीला प्रारंभ, कामानिमित्त रोज ये-जा करणाऱ्यांसाठी सुविधा
पणजी-झोळंबे फेरीला प्रारंभ,
पणजी-झोळंबे फेरीला प्रारंभ,sakal

कोलझर : दशक्रोशीतील गोव्यात कामानिमित्त जाणाऱ्यांसाठी कदंब महामंडळाने सुरू केलेल्या पणजी-झोळंबे बसफेरीचे दशक्रोशीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. याचे उद्‍घाटन कळणे येथे पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी गोव्यातून सिंधुदुर्गवासीयांना नेहमीच सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कामानिमित्त रोज ये-जा करणाऱ्यांसाठी कदंब महामंडळाची पणजी-झोळंबे अशी बससेवा गुरुवारी सुरू झाली. आमदार आर्लेकर यांनी बससेवेला प्रारंभ केला. यावेळी या बससेवेसाठी प्रयत्न करणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी सभापती प्रमोद कामत, बांदा सरपंच अक्रम खान, दोडामार्ग नगरसेवक संतोष नानचे, हसापूर सरपंच तुळशीदास गवस, संतोष मुळीक आदी उपस्थित होते. दरम्यान, कळणेतील स्वागतावेळी माजी सरपंच आनंद देसाई, सुनीता भिसे, पंच सदस्य अजित देसाई, भाजप माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, सूर्या गवस, शक्तिप्रमुख प्रवीण गांवकर, शैलेश गांवकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. नाडकर्णी व प्रमोद कामत यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आमदार जीत आरोलकर, प्रवीण आर्लेकर यांच्या विशेष सहकार्याबद्दल आभार मानले. तळकट येथे ग्रामस्थांनी स्वागत केले. या बसफेरीचे स्वागत झोळंबे येथे उत्साहात करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, सरपंच राजेश देसाई, उपसरपंच पांडुरंग गवस, माजी सरपंच सतिश कामत, कदंबा महामंडळाचे वाहतूक निरीक्षक प्रदीप पत्रे, उपवाहतूक अधिक्षक दिलीप भट, वाहतूक अधिकारी सुरेश सावंत, दयानंद नाईक, भूषण वस्त, गजानन सावंत, रामचंद्र शेटकर, वामन वारंग, सतिश गवस, नारायण वझे, दत्ताराम कुंदेकर, विनोद नाईक, संजीव गवस, सुरेश नाईक आदी उपस्थित होते.

कळणेतील नोकरदारांना फायदा

कळणे येथे बसचे स्वागत कारण्यात आले. या सेवेचा कळणे दशक्रोशीतील गावातून गोव्यात कामाला जाणाऱ्याना फायदा होणार आहे. त्यामुळे गोवा सरकारच्या सहकार्यबद्दल कळणेतील ज्येष्ठ ग्रामस्थ विश्वास देसाई यांच्या हस्ते आमदार आर्लेकरांचा सत्कार झाला. आमदार म्हणाले, ‘‘गोवा आणि सिंधुदुर्गच्या सीमावर्ती भागाचे नाते ऋणानुबंधचे आहे. आम्ही नेहमीच येथील जनतेला सहकार्य करू. भाजपकडून येथील जनतेला गोव्यात नोकरी व अन्य सुविधांसाठी सकारात्मक प्रयत्न करू.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com