
गोवा पोलिसांनी तब्बल १ कोटी ८८ लाख रुपयांची व्हिस्की भरलेला कंटेनर जप्त केला.
esakal
मुख्य ठळक मुद्दे (Highlights Summary)
१ कोटी ८ लाखांचा दारू साठा जप्त: इन्सुली तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई करत ७२,००० बाटल्या आणि कंटेनर जप्त केला.
दोघांना अटक: राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील दोन आरोपी — रामनिवास व नूर आलम — यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
उच्चस्तरीय तपास: ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करीत आहेत.
Goa Made Liquir : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली तपासणी नाका येथे दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (ता. ६) रात्री १ वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने केली. याप्रकरणी वाहन चालक रामनिवास (वय २५, रा. बाडमेर, राजस्थान) आणि नूर आलम (२६, रा. प्रतापगढ, उत्तर प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल केला. या कारवाईत मद्य वाहतुकीसाठी वापरलेला कंटेनरही जप्त केला आहे.