Ratnagiri Farmer: केवळ दोन शेळ्यांपासून सुरू झालेला प्रवास! साई कदम यांच्या शेळीपालनातून लाखोंचे उत्पन्न, कोकणातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी कहाणी
Faremer story: भातशेतीवर अवलंबून राहून गृहउपजीविकेची तारेवरची कसरत करणाऱ्या साई कदम यांनी केवळ दोन शेळ्यांपासून सुरू केलेला व्यवसाय आज लाखोंचे उत्पन्न देणारे शाश्वत मॉडेल ठरले आहे.
पावस: कोकणातील शेतकरी म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो भात उत्पादक किंवा आंबा, काजू व नारळ बागायतदार. गेल्या काही वर्षांमध्ये येथील शेतकरी पारंपरिक शेतीच्या जोडीला शेतीपूरक व्यवसाय करून चांगले अर्थार्जन करू लागले आहेत.