गोडसेच्या विचारांचे उदात्तीकरण हा देशद्रोहच - नीतेश राणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

कणकवली - महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या विचारांचे उदात्तीकरण हा देशद्रोह आहे. तर त्याला समर्थन करणारे हे देखील देशद्रोही ठरतात. शिवसेनेने हे राम नथुराम' या नाटकाचे जसे समर्थन केले तसेच उद्या शरद पोंक्षे यांनी याकूब मेमनच्या समर्थनात नाटक काढले तर त्याचेही समर्थन करतील काय? असा सवाल आमदार नीतेश राणे यांनी केला आहे. 

श्री. राणे यांनी पत्रकात म्हटले की, मूळ गांधीवादी आणि 2008 मध्ये शिवसैनिक झालेल्या आमदार वैभव नाईक यांनी आम्हाला देशाभिमान शिकविण्यापेक्षा देशाच्या अस्मितेवर बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली भाषणे पहिली ऐकावित. आम्ही नाटकाला केलेला विरोध हा राजकीय कार्यकर्ता म्हणून नाही तर एक भारतीय नागरिक म्हणून केला आहे. गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या विचारांच्या उदात्तीकरणाला समर्थन करणारे हे देशद्रोहीच आहेत. नाइलाजाने मोजक्‍या शिवसैनिकांना नाटक पाहायला लावून देशाबद्दलचे आपले विचार काय आहेत हे आमदार नाईक यांनी दाखवून दिले आहेत. 

पुढील काळात शरद पोंक्षे यांनी दहशतवादी याकूब मेमनच्या समर्थनात नाटक काढले तर शिवसैनिक त्याचे समर्थन करतील काय? ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी हे राम नथुराम' नाटकाला विरोध केला त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांना व जिल्हावासीयांना आणि देशवासीयांना अभिमान आहे. 

गेल्या अडीच वर्षांमध्ये झालेल्या सर्वच नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकींमध्ये कॉंग्रेस पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक जनतेने निवडून दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ पैकी पाच ठिकाणी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष आहेत. म्हणून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदावर चिकटून असलेल्या आमदार वैभव नाईक यांनी याची माहिती घेऊन बोलावे व आत्मपरीक्षण करावे. येणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचाच झेंडा फडकेल याचा ठाम विश्वास मला आहे, असेही आमदार राणे पत्रकात म्हटले आहे. 

Web Title: Godse's thoughts elevate sublimation is treason