Gokul Election : 'संचालक मंडळात भाजपच मोठा भाऊ असेल', खासदार महाडिकांचे मंत्री मुश्रीफांना प्रत्युत्तर; महाडिक-नरके एकाच गाडीतून आल्याने चर्चांना उधाण

Gokul Milk Union election latest news : गोकुळ दूध संघ निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असल्याचा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केला.
Dhananjay Mahadik latest statement

Dhananjay Mahadik latest statement

esakal

Updated on: 

कोल्हापूर : भाजपकडे १४३० ठराव आहेत. यातील एकही संस्था अवसायनात नाही. याशिवाय आणखी काही ठराव मिळणार (Dhananjay Mahadik on Gokul election) आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) असणाऱ्या ठरावामध्ये यड्रावकर, कुपेकर, शेतकरी कामगार पक्ष यांचेही ठराव आहेत. हे ठराव राष्ट्रवादीचे कसे. त्यामुळे गोकुळची निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार असून, संचालक मंडळात भाजपच मोठा भाऊ असेल, असे प्रत्युत्तर खासदार धनंजय महाडिक यांनी मंत्री मुश्रीफ यांना दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com