ती मुले- मुली सध्या काय करतात.... ?

good time spend in 9 girls in Devrukh Matrumandir Gokul Balikashram kokan marathi news
good time spend in 9 girls in Devrukh Matrumandir Gokul Balikashram kokan marathi news

साडवली (रत्नागिरी) : लाॅकडाऊन काळात त्या मुला - मुलींनी काय केले हे जावून पाहीले असता हा काळ या मुला- मुलींनी सत्कारणी लावत आपली प्रगती  करुन घेतलेली दिसली.
ही मुले- मुली म्हणजे ज्यांना कोणी नाही ती मुले संस्थेच्या माध्यमातुन शासनाच्या नियमावली प्रमाणे शिकणारी,धडपडणारी मुले लाॅकडाउनच्या काळात आरोग्याची काळजी घेत विविध कामे शिकत आपला वेळ सत्कारणी लावत आहेत.

हेही वाचा- शिव थाळीला सावंतवाडीत टक्कर कमळ थाळीची ​
कुणी बांधल्या झाडु,कोणी शिकले स्वंयपाक

देवरुख मातृमंदिर गोकुळ बालीकाश्रमात ९ मुली आहेत.कार्यवाह आत्माराम मेस्ञी यांच्या मार्गदर्शनात सकाळी १ तास प्रार्थना,गाणी म्हणत तसेच इंग्रजीचा अभ्यास करत आहेत.काही मुलींनी परीसरातल्या झावळा आणुन सुंदर झाडु बनवल्या,तर काहींनी चिञे रेखाटली आहेत.काही मुलींनी स्वयंपाकाचे धडे गिरवले व त्या सुगरणही बनल्या.परीसर स्वच्छता केली.तसेच स्वयंशिस्तीचे धडे गिरवले.कुडवली येथील सांदिपनी गुरुकुल मधील १० मुलांनी कृषी विभागात विविध उपक्रम राबवले.गांडुळखताची निर्मिती केली.दररोज अभ्यास व चळवळीतील गीते पाठ केली.प्रकाश कारखानिस यांनी त्यांना मार्गदर्शन केले.साखरपा येथील विलगीकरण कक्षासाठी सांदिपनीने ३० बेड दिले.


मुलांनी चिञे रेखाटुन कलेचा आनंद लुटला.
देवरुख मधील साहस या विशेष गरजा असणार्‍या मूलांनी घरी राहुनच शिक्षक सांगतील ते काम पुरे केले.या मुलांना घरी जावून शिक्षकांनी शिकवले.या मुलांचा बुद्यांक कमी असला तरी त्यांना ही सुट्टी नकोशी वाटत आहे.एव्हढी शाळेला कधीच सुट्टी नसते हे या मुलांनी बोलुन दाखवले.अशी ८ मुले घरी बसुन कंटाळुन गेली आहेत.त्यांना हाताला काम हवे आहे.या मुलांना विशेष जपले जात आहे.लाॅकडाउन काळात या सर्व मुला - मुलींनी गप्प न बसता केलेले हे विविध उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com