रत्नागिरी जिल्ह्यातील सरकारी कार्यालयामध्ये शुकशुकाट

राजेश शेळके
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अरे कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा गगनभेदी घोषणा देत जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ समन्वय समितीचे शेकडो कर्मचारी संपात सामिल झाले.

रत्नागिरी - आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अरे कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा गगनभेदी घोषणा देत जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ समन्वय समितीचे शेकडो कर्मचारी संपात सामिल झाले. तिन दिवस संप असल्याने शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट होता. सर्वसामान्य लोकांच्या कामांचा खोळंबा झाला.  

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या - 

  • सातव्या वेतन आयोगाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी
  • अंशदायी पेन्शन योजना रद्द करा
  • महागाई भत्त्यात वाढ करावी
  • निवृत्तीचे वेतन 60 वर्षे करा
  • रिक्तपदे तत्काळ भरा
  • शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवा

मुख्यमंत्र्यांबरोबर संघटनांची चर्चा फिस्कटल्यानंतर राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली होती. संपात उतरण्याचे आदेश जिल्हा संघटनेला प्राप्त झाले. राजपत्रित शासकीय अधिकारी वगळता, अन्य अधिकारी, कर्मचारी संपात सहभागी होते. शासनाच्या या कारभाराविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आज उद्या आणि परवापर्यंत (ता. 9)  तीन दिवस संपावर आहेत. 

द्वितीय श्रेणीतील फक्त 5 हजर 

जिल्हाधिकारी कार्यालयातील पहिल्या श्रेणीतील वरिष्ठ अधिकारी सोडल्यास द्वितीय श्रेणीतील फक्त 5 कर्मचारी हजर होते. उर्वरित 35 संपात सहभागी, तृतिय श्रेणीतील 749 कर्मचारी संपात उतरले तर फक्त 2 हजर होते. चतुर्थश्रेणीतील तर 134 पैकी सर्वच्यासर्व संपात सहभागी होते.

Web Title: Government servant on strike