राज्यातील पदवीधर शिक्षकांना न्यायालयाचा मोठा दिलासा; जेष्ठता 24 मार्च 2023 च्या राजपत्रानुसारच

मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विखंडपिठाच्या निर्देशानुसार आता पदवीधर शिक्षकांची सेवा जेष्ठता ही 24 मार्च 2023 च्या राजपत्रानुसारच ठरणार आहे. त्यामुळे आता पदवीधर शिक्षकांचा सेवा जेष्ठतेचा तिढा सुटला आहे.
graduate teacher relife of mumbai high court seniority depend on 24th march 2023 letter
graduate teacher relife of mumbai high court seniority depend on 24th march 2023 letterSakal

पाली : मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विखंडपिठाच्या निर्देशानुसार आता पदवीधर शिक्षकांची सेवा जेष्ठता ही 24 मार्च 2023 च्या राजपत्रानुसारच ठरणार आहे. त्यामुळे आता पदवीधर शिक्षकांचा सेवा जेष्ठतेचा तिढा सुटला आहे. याबाबत राज्य पदवीधर डीएड कला क्रीडा शिक्षक संघाने आनंद व्यक्त केला आहे.

पदवीधर शिक्षक संघाचे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका क्रमांक 11243/ 2023 च्या निमित्ताने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन जामदार आणि न्यायधीश एम एम साठ्ये यांनी राजपत्राबाबत गुरुवारी (ता.18) माध्यमिक शिक्षकांचे सेवा जेष्ठतेबाबत महत्त्वपूर्ण अंतरिम निर्देश दिले आहेत.

या निर्णयाबद्दल पदवीधर डीएड कला, क्रीडा शिक्षक संघाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रानुसार न्यायालयाने स्पष्ट केले आहे की राजपत्र (अधिसूचना) दिनांक 24 मार्च 2023 नुसारच माध्यमिक शिक्षकांच्या सेवा जेष्ठता याद्या तयार कराव्यात आणि त्यानुसारच पदोन्नती प्रक्रिया राबवावी.

तत्पूर्वी याचिका क्रमांक 11243/ 2023 च्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 7/ 9/ 2023 रोजी निर्देश दिले गेले होते. सदर निर्देश याचिकाकर्त्या मीना अशोक कांबळे सरस्वती विद्यालय वाशिंद जिल्हा ठाणे आणि प्रतिवादी सचिव विद्या विकास मंडळ वाशिंद जिल्हा ठाणे यांच्याशीच संबंधित असल्याचे ही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याचिका क्रमांक 11243/ 2023 च्या अनुषंगाने न्यायालयाने दिनांक 7/ 9/ 2023 रोजी दिलेल्या निर्देशाचा गैरअर्थ काढत संस्थाचालकांनी जेष्ठता याद्या बदलल्या.

राजपत्रानुसार बनवलेल्या जेष्ठता यादींकडे दुर्लक्ष केले. जाणीवपूर्वक बीएड ही व्यवसाय पात्रता पूर्ण केलेल्या तारखेनुसार सेवा जेष्ठता यादी तयार केल्या. राजपत्रातील दुरुस्तीनुसार नसलेले पदोन्नती प्रस्ताव शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक (माध्यमिक) कार्यालयाकडे दाखल करण्यात आले. अशा चुकीच्या पद्धतीने पदोन्नती प्रस्तावांना मान्यता देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे राजपत्रानुसार सेवाजेष्ठता असलेल्या शिक्षकांवर अन्याय झालेला आहे. कायद्याच्या सरळ सरळ भंग झालेला आहे. अशी भूमिका हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. राम आपटे, ऍड. यतीन मालवणकर (अभय अनिल अंतुरकर कार्यासन) ऍड. जे. एच. ओक यांनी प्रभावीपणे मांडली.

मांडलेल्या न्यायसंघ स्पष्टीकरणामुळे न्यायालयाने स्पष्ट केले की दिनांक 7/9/ 2023 नंतर चुकीच्या पद्धतीने अर्थात राजपत्राच्या आदेशानुसार जेष्ठता डावलून दिल्या गेलेल्या मान्यता आता न्यायालयीन निर्णयाच्या आधीन राहणार आहेत. सहाजिकच अशा चुकीच्या पदोन्नतीचे भवितव्य न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहणार आहे.

राजपत्रानुसार डीएड (दोन वर्षाचा जुना पाठ्यक्रम) शिक्षक हा पदवी प्राप्त तारखेपासून प्रवर्ग क मध्ये समाविष्ट होतो. ही बाब शिक्षणाधिकारी/ शिक्षक निरीक्षकांनी यापुढे गांभीर्याने घ्यावी राजपत्रानुसार असलेली जेष्ठता डावलून पदोन्नती प्रस्तावांना मान्यता दिल्या गेल्या, तर तो कायद्याचा आणि न्यायालयीन निर्देशाचा अवमान ठरणार आहे.

सेवा जेष्ठता आणि त्यानुसार होणारी पदोन्नती ही शालेय शिक्षण विभागातील संवेदनशील प्रक्रिया आहे. शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक यांनी न्याय संगत भूमिका घ्यावी असे आवाहन पदवीधर डीएड कला क्रीडा शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप आवारे व सचिव महादेव माने यांनी केले आहे.

मागील अनेक वर्षे आम्ही या मागणीसाठी लढा देत होतो. मा. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्व डीएड पदीवधर शिक्षकांना दिलासा मिळाला असून पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

- महादेव साबळे, रायगड जिल्हा अध्यक्ष, डीएड पदवीधर संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com