ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुकीचे वारे ; राष्ट्रवादीचे मात्र एकहाती वर्चस्व

gram panchayat election run without opposition situation in ratnagiri
gram panchayat election run without opposition situation in ratnagiri

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्‍यात खेर्डीनंतर सर्वाधिक श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सावर्डे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बिनविरोध निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. स्थानिक स्तरावर बिनविरोधच्या चर्चा सुरू आहेत. सावर्डेत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. सेनेकडून ७ जागांची मागणी केली जात आहे. त्यामुळे आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत बिनविरोधचा अंतिम तोडगा निघणार आहे. 

तालुक्‍यासह जिल्ह्यात शैक्षणिक हब म्हणून सावर्डे गावाची ओळख राहिली आहे. येथे गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये झालेल्या सावर्डे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला १६ तर शिवसेनेला १ जागा मिळाली होती. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली होती.

शेवटी चिठ्ठीद्वारे झालेला कौल राष्ट्रवादीच्या उमेदवारास मिळाला होता. त्यामुळे पाच वर्षात सेनेचा एकच सदस्य कार्यरत होता. शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेकडून किमान ७ जागा मागण्यात आल्याची चर्चा आहे. 

सर्व १७ जागा जिंकण्याचा मनोदय

विधानसभा निवडणुकीत आमदार शेखर निकम विजयी झाल्याने पुन्हा सावर्डेतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. सर्व १७ जागा जिंकण्याचा त्यांचा मनोदय आहे; मात्र निवडणुकीवरून गावात कंदाल नको, यासाठी बिनविरोधच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

 राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले

सावर्डेत १७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. सावर्डेत राष्ट्रवादीचे प्राबल्य अधिक आहे. त्या तुलनेत शिवसेनेला जागा देण्याची तयारी सुरू आहे. ७ जागांची मागणी झाली असली तरी तेवढ्या जागा न देता २ ते ४ जागांपर्यंत तोडगा निघू शकतो, अशी चर्चा आहे. बिनविरोधच्या चर्चेसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आहे; मात्र आमदार शेखर निकम सध्या मुंबईत आहेत. आमदारांच्या उपस्थितीतच शिवसेनेला किती जागा द्यायच्या याचा फैसला होणार आहे.

इच्छुकांची तयारी पूर्ण 

बिनविरोधचा फैसला बाकी असल्याने दोन्ही पक्षांकडून इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्‍यक असलेले कागदपत्र जमविण्यास सुरवात केली आहे. घरपट्टी, पाणीपट्टी आदी करांची रक्कम भरणे अनिवार्य असल्याने ग्रामपंचायतीत या करांचा भरणादेखील केला जात आहे. सावर्डे ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यास तालुक्‍यात ते आदर्शवत ठरणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com