कणकवली तालुक्यात 31 ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज 

Gram Panchayat Reservation kankavli taluka sindhudurg district
Gram Panchayat Reservation kankavli taluka sindhudurg district

कणकवली (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील 63 ग्रामपंचायतींच्या पुढील पाच वर्षात होणाऱ्या सरपंचपदाचे आरक्षणाची उत्सुकता विविध पक्षांच्या गावातील कार्यकर्त्याना लागुन राहीली आहे. प्रथम महिलांसाठी 31 ग्रामपंचायतींचे सरपंचपद राखीव ठेवण्यात येईल. अनुसुचित जाती आणि जमातीसाठी एकूण 6 आणि इतर मागास प्रवार्गासाठी 17 सरपंच पदाच्या जागा राखीव असतील. याखेपेस सदस्यांमधून सरपंच निवड होणार आहे. 

ग्रामपंचायतीच्या निवडणूकांची प्रक्रीय पुर्ण झाली. निकालानंतर विविध पक्षाच्या नेत्यांनी आपला दाव ठोकला आहे; पण खरी प्रतिक्षा ही सरपंच पदाच्या आरक्षणासाठी आहे. ग्रामविकास विभागाने 28 जानेवारीला सरपंच आरक्षण सोडत जाहीर केल्याने आता या सोडतीकडे निवडून आलेल्या मंडळीचे लक्षकेंद्रीत झाले आहे. हे आरक्षण 2021 ते 2026 पर्यत लागु राहणार आहे. 

सरपंच पदासाठी आरक्षण सोडत तहसिलदार कार्यालयात चिठ्ठी पध्दतीने काढण्यात येणार आहे. यात तालुक्‍यातील 63 ग्रामपंचायतींमध्ये 31 सरपंचपदे ही महिलांसाठी राखीव होतील. अनुसुचित जातीसाठी 5 पदे असून 2 महिलांसाठी आहेत. अनुसुचित जमातीच्या प्रवर्गासाठी 1 सरपंचपद राखीव असुन याखेपेस ते त्या प्रवर्गातील महीला राखीव होणार आहे. इतर मागास प्रवार्गातील 17 पैकी 8 ग्रामपंचायती महीला राखीव होणार आहेत. सर्वसाधारणसाठी 40 पैकी 20 सरपंचपदे महीला राखीव होणार आहेत. 
तालुक्‍यातील 2015 ते 2020 साठी असे होते सरपंच आरक्षण असे ः अनुसुचित जाती महीलासाठी राखीव - डामरे, साळीस्ते आणि शिवडाव, अनुसुचितजातीसाठी दारूम, सावडाव, भिरंवडे यांचा समावेश आहे.

इतर मागास प्रवर्गासाठी 17 ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित होते. यात कासरल, हळवल, वारगांव, शिरवल, माईण, नागवे, बिडवाडी, करंजे, तोंडवली - बावशी यांचा समावेश आहे तर इतर मागास प्रवर्गातील आठ सरपंचपदे महिलांसाठी राखीव आहेत. यात हुंबरठ, हरकुळखुर्द, तिवरे, तळेरे, सांगवे, कोंडये, दिगवळे, कसवण-तळवडे यांचा समावेश आहे. खुल्या प्रवर्गात 40 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

यातील 20 ग्रामपंचायती महिला राखीव आहेत. सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आशिये, बेळणेखुर्द, भरणी, चिंचवली, गांधीनगर, घोणसरी, हरकुळ - बुद्रुक, जानवली, कलमठ, कळसुली, कोळोशी, कुरंगवणे- बेर्ले, नांदगाव, नरडवे, नाटळ, पियाळी, साकेडी, शिडवणे, तरंदळे, वागदे यांचा समावेश आहे. तर सर्वसाधारणसाठी असलदे, आयनल, बोर्डवे, दारिस्ते, करूळ, ओझरम, फोंडाघाट, पिसेकामते, शेर्पे, सातरल, वरवडे, वायंगणी आणि वाघेरी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

सरपंच आरक्षण रोटेशन बदलणार 
सरपंच पदाचे आरक्षण हे 1995 ते 2000 आणि 2000 ते 2005 या वर्षातील रोटेशन लक्षात घेवून निश्‍चित करण्यात आले होते. 1995 ते 2015 या 20 वर्षात वेगवेगळी चार आरक्षणे होती; मात्र 2015 ते 2020 पर्यंत जेथे महिला आरक्षण होते तेथे महिला आरक्षण पुढील पाच वर्षासाठी वगळण्यात येणार आहे. 

उपसरपंचपदाला संधी 
ज्या गावात सरपंच आरक्षण निश्‍चित होणार आहे त्या गावातील प्रभागात जर त्या प्रवार्गाचे आरक्षण नसेल किंवा त्या प्रवर्गातील व्यक्ती निवडणून आलेली नसेल तर सरपंच पद रिक्त राहील. तेथे उपसरपंच पदाला अधिक महत्व प्राप्त होणार आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com