ग्रामसेवकांच्या आंदोलनाला कर्मचारी संघटनेचा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

कणकवली - प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने कंत्राटी ग्रामसेवक वगळून शुक्रवार (ता.१८) पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आज ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून पाठिंबा दिला. यामुळे तलाठी कार्यालयाबरोबरच ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाजदेखील ठप्प झाले होते.

कंत्राटी कामगारांचा ३ वर्षे सेवाकाल नियमित होण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, सोलापूर तसेच ठाणे जिल्हा परिषदेमार्फत ग्रामसेवकांवर झालेली चुकीची कारवाई रद्द करावी, पगारासोबत ३ हजार रुपये प्रवासभत्ता द्यावा आदी १५ मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामसेवक संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यात तलाठी कार्यालयाच्या चाव्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपविल्या. ग्रामसेवक काम बंद आंदोलनात सहभागी झाले असले तरी त्याची दखल राज्य शासनाने घेतली नाही. यात ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाज देखील ठप्प झाले होते. दरम्यान, मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम परब व सरचिटणीस सुनील पांगम यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Gramasevak movement of the support staff organization